AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flood: बाहेर भयंकर पूर अन् शाळेत अडकले होते 1643 विद्यार्थी… मुख्याध्यापकाच्या शहाणपणामुळे वाचले मुलांचे प्राण

Nepal Flash Flood Update: नेपाळमध्ये आलेल्या भयंकर पूरामुळे आतापर्यंत जवळजवळ ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. पण या पुरात एका शाळेच्या मुख्याध्यापकाने वेळीचं घेतलेल्या एका निर्णयामुळे आता कसे शाळेतील विद्यार्थ्यांचे प्राण वाचले ते जाणून घ्या...

Nepal Flood: बाहेर भयंकर पूर अन् शाळेत अडकले होते 1643 विद्यार्थी... मुख्याध्यापकाच्या शहाणपणामुळे वाचले मुलांचे प्राण
| Updated on: Aug 30, 2026 | 4:08 PM
Share

Nepal Flash Flood: नेपाळमधील पूर आपत्तीत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध ठिकाणी मदत आणि बचाव पथके अजूनही कार्य करत आहेत. हजारो लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, येथे दुसऱ्यांदा गंभीर पुराचा इशारा देण्यात आला आहे. तिबेटच्या पर्वतरांगांमध्ये हिमनदी तुटल्यामुळे हा विनाश झाला. पण आता या पुरा दरम्यान शाळेतील शिक्षकाच्या निर्णयाने तब्बल १,६४३ मुलांचे प्राण वाचले आहेत.

नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशुली खोऱ्यातील एका शाळेत १,६४३ मुले उपस्थित होती. मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी कोणताही विलंब न करता शाळा रिकामी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नंतर १,६४३ मुलांसाठी जीवनरक्षक ठरला. बुधवारी सकाळी सुमारे ९:२० वाजता, दवाडी यांना एका मित्राचा फोन आला. त्याने कळवले की गाव नदीच्या प्रवाहात वाहून गेले आहे आणि त्यांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. दवाडी यांना सुरुवातीला वाटले की त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक शाळा सुरक्षित आहे. तीन मजली काँक्रीटची इमारत नदीपासून सुमारे ६० मीटर उंचीवर होती.

माध्यमांच्या वृत्तानुसार, धोका जाणवताच दवाडी यांनी कोणताही विलंब न करता शाळेची घंटा वाजवली. त्यांनी तात्काळ शिक्षकांना सर्व वर्गखोल्या रिकाम्या करण्याचे निर्देश दिले. त्यांनी बस चालकांनाही फोन करून मागे फिरण्याचे निर्देश दिले, जरी ते पूल ओलांडणारी एक बस थांबवू शकले नाहीत. धोका जाणवल्याने मुले घाबरली. एक मुलगी भीतीने बेशुद्ध झाली आणि तिला तात्काळ सायकलवरून डोंगरावर सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले. इतर मुले पायी डोंगरावर धावत गेली, तर दवाडी कोणीही मागे राहणार नाही याची खात्री करण्यासाठी मागे थांबले. काही मिनिटांतच, सर्व मुले सुरक्षितपणे शिखरावर पोहोचली.

मुले वर पोहोचताच शाळा पूराच्या पाण्यात वाहून गेली. क्षणातच, पाण्याच्या जोरदार प्रवाहाने संपूर्ण इमारत वाहून नेली. काही क्षणांपूर्वी जिथे मुले अभ्यास करत होती, ते ठिकाण आता चिखल, ढिगारे आणि पाण्याने भरलेले एक भयानक दृश्य बनले होते. दवाडींच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे १,६४३ मुले आणि जवळजवळ सर्व शिक्षक वाचले, पण ते आपल्या दोन सहकाऱ्यांना या दुर्घटनेचा बळी होण्यापासून वाचवू शकले नाहीत.

इतक्या मुलांचे प्राण वाचवल्यानंतर दवाडी म्हणाले की, “त्या वेळी मी आणखी काय करू शकलो असतो? पाणी आत शिरण्यापूर्वी त्या निष्पाप मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, हाच त्याच्या मनातला एकमेव विचार होता. “

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक