AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढल गया दिन, हो गयी शाम, नाशिकमध्ये भुजबळ-अजितदादांचा बॅडमिंटन सामना, विखेंची हजेरी

नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar and Chhagan Bhujbal play badminton) यांनी आज विविध जिल्ह्यांच्या विकासकामांचा आढावा घेतला.

ढल गया दिन, हो गयी शाम, नाशिकमध्ये भुजबळ-अजितदादांचा बॅडमिंटन सामना, विखेंची हजेरी
अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील एका कोर्टमध्ये तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ असा सामना काहीवेळ रंगला. आधी अजित पवार आणि छगन भुजबळ हे बॅडमिंटन खेळले, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही हातात रॅकेट देण्यात आलं.
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jan 31, 2020 | 7:51 PM
Share

नाशिक : नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar and Chhagan Bhujbal play badminton) यांनी आज विविध जिल्ह्यांच्या विकासकामांचा आढावा घेतला. अजित पवारांनी आज भल्या सकाळी कामाला सुरुवात केली. दिवसभर कामकाज आटोपल्यानंतर, संध्याकाळी शासकीय विश्रामगृहावर अजितदादांनी बॅडमिंटनवर हात (Ajit Pawar and Chhagan Bhujbal play badminton) आजमावला.

अजित पवारांनी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील एका कोर्टमध्ये तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ असा सामना काहीवेळ रंगला. आधी अजित पवार आणि छगन भुजबळ हे बॅडमिंटन खेळले, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही हातात रॅकेट देण्यात आलं.

अजित पवार-राधाकृष्ण विखे पाटलांची भेट

दरम्यान, या सामन्यापूर्वी अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती समोर आली नाही. मात्र “अजित पवार जुने सहकारी आहेत. राज्यभर काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेत आम्ही एकत्र होतो. त्यामुळे जुने सहकारी एकत्र आल्यावर भेट होते”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली