अजित पवार पुन्हा टार्गेटवर! ईडीकडून चौकशी होणार? कोणत्या घोटाळ्याचा आरोप?

सिद्धेश सावंत

|

Updated on: Oct 17, 2022 | 8:54 AM

विरोधी पक्षनेते अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता? ईडीसोबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार?

अजित पवार पुन्हा टार्गेटवर! ईडीकडून चौकशी होणार? कोणत्या घोटाळ्याचा आरोप?
अजित पवार
Image Credit source: Social Media

सुमित सरनाईक, TV9 मराठी, मुंबई : शिखर बँक कथित घोटाळा (Shikhar Bank) प्रकरणी अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा टार्गेटवर आले आहेत. अजित पवारांची ईडी (ED) आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह 72 संचालकांची चौकशी होणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय.

ईडीनं कोर्टात सादर केलेल्या अहवालात पुरावे असल्याचा उल्लेखही करण्यात आल्याचं कळतंय. याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्याचे आदेशही कोर्टाकडून करण्यात आले होते. त्यानंतर 18 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान याआधी आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट दाखल करून चौकशी बंद केली होती. मात्र आता पुन्हा चौकशी सुरू करण्यात आलीय. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे शिखर बँक घोटाळा?

23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेनं तारण न देता कर्ज दिलं असल्याची बाब समोर आली होती. 2001 ते 2011 या काळात ही कर्ज देण्यात आली होती. आघाडी सरकारच्या काळात या कर्जवाटप प्रकरणी कर्जवसुली चुकवली, असा आरोप करण्यात आला होता.

अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना ही कर्ज देण्यात आली असल्याचाही आरोप करण्यात आला होता. नेत्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला.

तब्बल 2 हजार 61 कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा असल्याचंही सांगितलं जातं. यात सरकारी तिजोरीला 25 हजार कोटी रुपयांचा फटका बसला होता, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.

पुन्हा चौकशीचा ससेमिरा?

खरंतर शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता. याबाबत सी-समरी अहवाल दाखल करुन हे प्रकरण बंद करावं, अशी विनंतीही करण्यात आली होती. तपासाअंती कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याचं कृत्य आढळलं नसल्याचा अहवाल देण्यात आला होता.

दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या या अहवालानंतर आता पुन्हा शिखर बँक घोटाळ्याची फाईल उघडली जाणार, असं बोललं जातंय. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांसह अनेकांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI