अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक, नेमकं काय घडलं? राष्ट्रवादीच्या आमदारानेच दिली माहिती

या फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.

अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक, नेमकं काय घडलं? राष्ट्रवादीच्या आमदारानेच दिली माहिती
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 4:42 PM

Ajit Pawar Facebook Hack : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आता अजित पवार यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन एक आक्षेपार्ह मजकूर असलेले एक फेसबुक पेज फॉलो करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवली जात आहे. या फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अजित पवार यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. अजित पवारांच्या फेसबुकवरुन अडल्ट कंटेंट असलेल्या पगलेट क्वीन नावाच्या फेसबुक पेजला काल रात्री फॉलो करण्यात आले. यापूर्वी अजित पवारांच्या फेसबुक पेजवरुन 4 जणांना फॉलो केले जात होते. यात पार्थ अजित पवार, एनसी स्पीक्स, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या चार नावांचा समावेश होता. त्यानंतर अचानक रात्री या पगलेट क्वीनला फॉलो करण्यात आले.

पगलेट क्वीन या फेसबुक पेजवर अडल्ट कंटेट शेअर केला जात होता. मात्र अचानक अजित पवारांच्या फेसबुक पेजवरुन फॉलो करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याचे अनेक स्क्रीनशॉटही व्हायरल झाले. यानंतर अजित पवार यांचे सोशल मीडिया सांभाळणाऱ्या टीममधील व्यक्तीच्या हातून हा प्रकार झाला की अकाऊंट खरोखरच हॅक झाले? याची अद्याप कोणतीही माहितीसमोर आलेली नाही.

शिवाजीराव गर्जे काय म्हणाले?

या घटनेनंतर आमदार शिवाजीराव गर्जे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अजित पवारांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून ते सोशल मीडियावर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरली जात आहे. याबद्दल सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा नोंद करुन संबंधितांवर कायदेशीररित्या योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली. तसेच अजित पवार यांच्या अधिकृत फेसबुकचे खोटे स्क्रीनशॉट काढून व्हायरल करणे म्हणजे जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. अजित पवार यांच्या फेसबुक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धादांत खोटे, खोडसाळपणाचे आहे. तसेच या प्रकरणाची कोणतीही खातरजमा न करता काही इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. माध्यमांनी प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून वृत्त प्रसिद्ध करणे अपेक्षित होते, असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.

तर अजित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन आक्षेपार्ह मजकूर असणारे फेसबुक पेज फॉलो केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनीही तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले. या संदर्भात सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याचेही सूरज चव्हाण यांनी म्हटले.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.