अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भांत नेमकं काय ठरलं होतं? सुनील तटकरेंनंतर NCPच्या आणखी एका बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
अजित दादा असते तर 12 फेब्रुवारीला विलिनीकरण झाले असते असं मोठे विधान सुनील तटकरेंनी केले होते. सुनील तटकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

NCP MLA Anil Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळाले. अजित दादा असते तर 12 फेब्रुवारीला विलिनीकरण झाले असते असं मोठे विधान सुनील तटकरेंनी केले होते. सुनील तटकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणालेत अनिल पाटील?
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या संदर्भात सुनील तटकरे यांनी केलेले वक्तव्य हे आम्हालाच संभ्रपात पाडण्यासारखे आहे. अजित दादा गेल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विलिनीकरण होणार नाही असा निर्णय झाला होता. ज्यामुळे विलिनीकरणासंदर्भातील चर्चेला काहीही अर्थ नाही, असं अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सुनील तटकरे यांनी दादांसोबत अगोदर चर्चा केली असेल पण ती चर्चा आता पडद्याआड गेली आहे. त्यामुळे विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा नाही हे स्पष्ट आहे,” असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना अनिल पाटील यांनी प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीवरही भाष्य केले. “प्रफुल्ल पटेल हे अजित दादा असताना त्यांच्यासोबत अनेक वेळा महत्त्वाच्या ठिकाणी भेटीसाठी घेत होते.आणि आता शरद पवार यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.त्यामुळे वेगळा काही चर्चेचा विषय नाही. आमचे हितचिंतक हे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत,” असं ते म्हणाले.
नरेंद्र मोदी अनेक भाषणांमध्ये सांगतात की शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत. मिडिया माध्यमातून मला एकच प्रश्न विचारायचा आहे जर शरद पवार पक्ष हा विलीनीकरण होऊन सत्तेत येत असेल तर चांगली गोष्ट आहे. दोघांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत. शरद पवार यांना जर मोदी साहेबांचे नेतृत्व मान्य असेल तर ते त्यांचा पक्ष एनडीए सरकारमध्ये समावेश करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतात.विलीनीकरणाचा सर्वत् अधिकार वहिनींना आहे, असंही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.