“कोश्यारींना त्यांच्या राज्यात जायचंय, ते स्वत: सांगतात, पण त्यासाठी शिवरायांवर बोलणं योग्य नाही”

| Updated on: Nov 28, 2022 | 12:20 PM

अजित पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिलीय...

कोश्यारींना त्यांच्या राज्यात जायचंय, ते स्वत: सांगतात, पण त्यासाठी शिवरायांवर बोलणं योग्य नाही
Follow us on

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Shingh Koshyari) यांच्यावर वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल देखील खासगीत सांगतात की त्यांना त्यांच्या राज्यात परत जायचंय. त्यामुळे हे सगळे सुरु आहे का? ते मुद्दाम हे सगळं बोलतायत का असा प्रश्न पडतो. राज्यपालांची नेमणूक जे करतात त्यांनी कोश्यारींना समज देण्याची गरज आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत

पालिका निवडणुकीवरही कोश्यारी बोललेत. पालिका निवडणुका लांबल्याने कार्यकर्त्यांना त्रास होतोय. निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत. नुसत्या तारीख पे तारीख जाहीर होतायत. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हे सुरुय, असंही अजित पवार म्हणालेत.

राज ठाकरेंचे विचार त्यांच्यासोबत माझे विचार माझ्यासोबत आहेत. आमच्या पोटात एक असं नसतं. कुणीतरी काहीतरी बोलतो आणि बेरोजगारी , शेतकऱ्यांचे वगैरे मुद्दे मागे पडतात आणि इतर विषयांवर चर्चा सुरु होते. तसं न होता लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

सीमाभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारने तरतूद करावी. आमच्यावेळी अशी मागणी झाली असती तर आम्ही लगोलग तरतूद केली असती, असंही अजित पवार म्हणालेत.

या आधी अनेकदा नोकरभरती झाली पण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी कधी नियुक्तीपत्रे दिली नाहीत. अलिकडच्या काळात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे रोष कमी व्हावा यासाठी हे होतंय.ही नौटंकी बंद व्हावी, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका केली.