अजित पवार गटातील 27 आमदारांवर खैरात, भाजपची 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं देण्याची तयारी?

अजित पवारांच्या गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं देण्याची तयारी भाजपने दर्शवल्याची माहिती आहे.

अजित पवार गटातील 27 आमदारांवर खैरात, भाजपची 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं देण्याची तयारी?
Follow us
| Updated on: Nov 25, 2019 | 8:14 AM

मुंबई : बंड पुकारत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यासोबत 27 आमदारांचं पाठबळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व आमदारांवर मंत्रिपदांची खैरात होण्याची चिन्हं आहेत. कारण अजित पवारांच्या गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं देण्याची तयारी भाजपने (Ajit Pawar Supporter MLAs) दर्शवल्याची माहिती आहे.

रविवारची संध्याकाळ गाजली ती अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात रंगलेल्या ट्विटरवॉरने. अजित पवार शपथविधीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गेले. रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार पुन्हा आपल्या निवासस्थानी परतले.

अजित पवार ‘वर्षा’वर मंत्रिपदांच्या वाटाघाटीसाठी आल्याचं म्हटलं जातं. बैठकीला भाजपकडून विनोद तावडे, भूपेंद्र यादव आणि गिरीश महाजन यांचीही उपस्थिती असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याचं जाहीर करण्यात आलं. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी चर्चा झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. मुख्य सचिव आणि वित्त सचिवांशी यावर सविस्तर चर्चा होईल असंही ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काका-पुतण्याचं ट्विटरयुद्ध

‘भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं आहे’, असं शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. अजित पवारांनी आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचा दावा ट्विटरवरुन केल्यानंतर पवारांनीही ट्विटरवरुनच आपली भूमिका मांडली होती.

‘भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने एकमताने सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री अजित पवार यांचं विधान हे खोटं, संभ्रम निर्माण करणारं, तसंच लोकांची दिशाभूल करणारं आहे.’ असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायमच राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. या ट्वीटलाच शरद पवारांनी उत्तर दिलं.

आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी दिली होती.

‘काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार’ असंही अजित पवार पुढे म्हणाले होते.

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. त्यानंतर रविवारी संध्याकाळच्या सुमारास अजित पवारांनी एकामागून एक असे 21 मिनिटांत 21 ट्वीट केले. अजित पवार यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद, आपण राज्याला एक स्थिर सरकार देऊ. जे लोकहितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करेल’ असं त्यांनी ट्विटवर म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक भाजपच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानले.

त्यानंतर राष्ट्रवादीसोबत असल्याचं सांगत अजित पवार यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. परंतु अजित पवारांनी परतण्याची तयारी दर्शवली नव्हती.

अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीकडून वारंवार त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत.

अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना भुलवून त्यांनी राजभवनावर नेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. परंतु पक्षातील त्यांचं सदस्यत्व कायम (Ajit Pawar Supporter MLAs) आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.