Maharashtra Assembly Session : नार्वेकर जिथे जातात तिथल्या नेत्याला आपलसं करतात, शिंदेजी आता तुमचं काही खरं नाही; अजितदादांच्या विधानाने खसखस

Maharashtra Assembly Session 2022 : भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर विधासनभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी आज सभागृहात जोरदार भाषण केलं.

Maharashtra Assembly Session : नार्वेकर जिथे जातात तिथल्या नेत्याला आपलसं करतात, शिंदेजी आता तुमचं काही खरं नाही; अजितदादांच्या विधानाने खसखस
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jul 03, 2022 | 12:59 PM

मुंबई: राहुल नार्वेकर (rahul narvekar) कुठेही गेले तरी ते त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या अत्यंत जवळ जातात. ते शिवसेनेत (shivsena) गेले. तेव्हा आदित्य ठाकरेंना आपलसं करून टाकलं. आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी मला आपलसं केलं. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आपलसं करून घेतलं. शिंदे साहेब आता तुम्हाला आपलंसं करून घ्या नाही तर काही खरं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हणताच विधानसभेत एकच खसखस पिकली. भाजपमधील जुन्या मान्यवरांची विधानसभा अध्यक्षपदाची संधी हुकल्याने मला आश्चर्य वाटलं. जे मुनंगटीवार, शेलार, महाजन कुणाला जमलं नाही ते राहुल नार्वेकर यांनी तीन वर्षात करून दाखवलं. मी तुम्हाला सूचवलं होतं. त्यांना अध्यक्ष करा. म्हणूनच त्यांना आठवण करून दिली. म्हटलं काय बडबड करायची ते तिथे करा, असं अजित पवार (ajit pawar) म्हणाले.

भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर विधासनभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी आज सभागृहात जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच चिमटे काढले. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून मी राष्ट्रवादीच्यावतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, असं अजित पवार यांनी म्हटलंय. आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलंय. राहुल नार्वेकरांकडून सगळ्यांना न्याय मिळेल आणि विकासाचं चाकं अधिक गतीमान होतील, असा विश्वास मी व्यक्त करतो, असं ते म्हणाले.

तरुण, अभ्यासू अध्यक्ष सभागृहाला मिळाला

दिग्गजांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी काम केलंय. मधल्या काळात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नरहरी झिरवळ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनीही या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आताही उपाध्यक्ष म्हणून त्यांची तुम्हाला चांगली साथ मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. राजकीय जीवनात चढ उतार असतात, हे सगळ्यांनी पाहिलंय. कामकाज निःपक्षपणे चाललं पाहिजे. नार्वेकरांच्या रुपानं एक तरुण, अभ्यासू व्यक्तिमत्त्व सभागृहाला अध्यक्ष म्हणून मिळालंय. असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पण तुम्ही हुश्शार निघाला

तुमचं नेतृत्व संयमी नेतृत्व आहे. तुम्ही पूर्वी शिवसेनेत होते. तुम्ही आदित्य ठाकरेंचे जवळचे सहकारी म्हणून तुम्ही काम केलं. असं माझ्या कानावर आलं. तुम्ही आदित्य यांना कायदेशीर बाबी सांगण्याचं काम केलं. आम्ही अशा लोकांवर लक्ष्य ठेवून असतो. तुम्ही शिवसेनेत काम करत होता. तेव्हा आम्हाला मावळमध्ये सुशिक्षित उमेदवार हवा होता. आम्ही तुम्हाला मावळमधून उमेदवारी दिली. तुम्ही उमेदवार म्हणून निवडून आला नाही. मोदींची जबरदस्त लाट असल्याने मी मी म्हणणारे पडले. पण तुम्ही हुश्शार होता. मी उमेदवार होईल. पण मला अपयश आलं तर मला कुठे तरी सदस्य करा, असं तुम्ही सांगितलं. त्यानंतर तुम्हाला आम्ही विधान परिषदेत पाठवलं, असं त्यांनी सांगितलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें