मुंबईत एक डोनाल्ड डक मोकाट सुटलाय… ठाकरेच्या नेत्याचा भाजप नेत्यावर जोरदार हल्ला; थेट कार्टुन…

सध्या सोशल मीडियावर आमदार अमित साठम यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याने कार्टुनचा वापर करुन भाजपवर टीका केली आहे.

मुंबईत एक डोनाल्ड डक मोकाट सुटलाय... ठाकरेच्या नेत्याचा भाजप नेत्यावर जोरदार हल्ला; थेट कार्टुन...
अखिल चित्रे
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 04, 2026 | 6:37 PM

मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या एका व्हिडीओवर सडकून टीका होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी बाकावरचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना साहेब काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं, असं बोलताना अमित साटम हसत आहेत. विधिमंडळ परिसरातील हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत असून त्यांनी यामध्ये थेट कार्टुन शेअर केले आहे.

काय आहे पोस्ट?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी डोनाल्ड डक या कार्टुनचा वापर केला आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की डोनाल्ड डक हे कार्टून साचलेल्या पाण्यात छत्री घेऊन उभे. या छत्रीवर वीर देसाई रोड अॅडवेंचर मोड ऑन असे लिहिले आहे. तसेच या कार्टुनचा मागे बेस्टची बस, एक कार पाण्यातून जात असल्याचे दिसत आहे. या फोटोवर अंधेरीचा डोनाक्ड डक असे देखील लिहिण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

फोटोने वेधले लक्ष

अखिल चित्रे यांनी हे कार्टुन शेअर करत, मुंबईत एक स्वतःला नेता म्हणवणारा ‘डोनाल्ड डक’ मोकाट सुटलाय. हा डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो आणि हा Donald duck पाण्यात स्टंट करतो. मिडिया कॅमेऱ्यासमोर पोझ देत नौटंकी करत फिरतो, बावचळलाय अगदी. कृपया महापालिका अधिकाऱ्यांना विनंती आहे, कुठे सापडला तर वीरमाता जिजाऊसाहेब उद्यानात सुरक्षित ठेवावा. कारण ह्याच्या फिरल्याने मुंबईकरांचं मनोरंजन कमी आणि संतापच जास्त होत आहे असे कॅप्शन दिले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

विधिमंडळ परिसरातील अमित साटम यांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला होता. अमित साटम या व्हिडीओत चक्क हसत असताना दिसत होते. मुंबईत झालेल्या दोन दुर्घटनांचा उल्लेख करून ते जयंत पाटील यांच्यासोबत बोलताना हासत होते. स्कुलबसवर झाड कोसळल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यात एका कुटुंबाने चिमुकला गमावला. 2 जुलै रोजी एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये मृत्यू झालेला असताना साटम मात्र हसत असल्याने संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर आज अमित साटम यांनी वीर देसाई रोडवर पावसामुळे साचलेल्या पाण्याचा आढवा घेतला आहे. त्यांनी मुंबई पालिकेच्या एका व्यक्तीशी देखील चर्चा केली आहे.

Follow Us