AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका

अकोला: अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राज्यभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मात्र संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी  जवळपास […]

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

अकोला: अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राज्यभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मात्र संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी  जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आले होते. मात्र अकोल्यात सध्या भाजप नेते रणजीत पाटील आणि संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये पडले आहेत. त्यामुळे विकासकामं रखडली आहेत. त्याचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा अकोल्यात आहे. त्याच तणावातून त्यांना काल रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येत आहे.

अकोल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची एन्जीओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती आहे.

कोण आहेत संजय धोत्रे? संजय शामराव धोत्रे हे भाजपचे अकोल्याचे विद्यमान खासदार आहेत. ते या मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.

2004, 2009 आणि 2014  या तीनही लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी विजय मिळवला.

संजय धोत्रे यांनी  2014 मध्ये त्यांनी अकोला मतदार संघात विजय मिळवला. त्या निवडणुकीत त्यांना 2 लाख 87 हजार मतं मिळाली. त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर जवळपास 64 हजार मतांनी विजय मिळवला.

संजय धोत्रे 1999 ते 2004 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेवरही  निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी थेट लोकसभा लढवली आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली