Raosaheb Danve : खासदारकी काय मह्या बापाची आहे का? मी सोडीन, पक्ष म्हणेल जाय घरी; रावसाहेब दानवेंचा खासदारकी सोडण्यास नकारच

एकीकडे जागावाटपावरुन तेढ निर्माण होणार हे स्पष्ट असताना दुसरीकडे खा. रावसाहेब दानवे हे भाजप आणि शिंदे गट हे येथून पुढे सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे खासदारकीला अर्जुन खोतकर यांना जागा सोडली जाणार का असा सवाल करताच ते आक्रमकही झाले होते.

Raosaheb Danve : खासदारकी काय मह्या बापाची आहे का? मी सोडीन, पक्ष म्हणेल जाय घरी; रावसाहेब दानवेंचा खासदारकी सोडण्यास नकारच
खा. रावसाहेब दानवेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 5:15 PM

जालना : (Arjun Khotkar) अर्जुन खोतकर हे शिंदे गटात आले तरी (Raosaheb Danve) रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यामध्ये कोणतेही मतभेद राहणार नाहीत. राजकीय मतभेद बाजूला सारुन आमचे मनोमिलन झाल्याचे या दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी यांच्यामध्ये सर्वच काही अलबेल असे सध्याचे तरी चित्र नाही. अर्जुन खोतकरांसाठी खासदारकी सोडणार का? या प्रश्नावर दानवे चांगलेच आक्रमक झाले. खासदारकी काय दानवेंच्या बापाची आहे काय? ही जागा सोडली तर पक्ष मला हाकलून देईल त्याचे काय? असा प्रतिसवाल करीत खासदारकीसाठी आपणच असाच त्यांचा काहीसा रोष होता. आगामी (ELection) निवडणुका भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी जागा कुणाला सुटणार यावर ते चांगलेच संतापले होते. तर ही भाजपाची पारंपरिक जागा असल्याचेही त्यांनी आठवण करुन दिली आहे.

भाजप अन् शिंदे गट एकत्र निवडणुक लढवणार

एकीकडे जागावाटपावरुन तेढ निर्माण होणार हे स्पष्ट असताना दुसरीकडे खा. रावसाहेब दानवे हे भाजप आणि शिंदे गट हे येथून पुढे सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे खासदारकीला अर्जुन खोतकर यांना जागा सोडली जाणार का असा सवाल करताच ते आक्रमकही झाले होते. त्यामुळे सध्या सरकारची स्थापना आणि त्यानंतर शिंदे गटात वाढत असलेले इनकमिंग यावर नेमका निवडणुकीत कसा तोडगा काढला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर हा लोकसभा मतदार संघ भाजपाचा पंरपरागत मतदार संघ असल्याचीही त्यांनी आठवण करुन दिली आहे.

सरकारमध्ये कोणीही नाराज नाही

मंत्रिपदावरुन आ. संजय शिरसाठ हे नाराज असल्याचा सूर गेल्या दोन दिवसांपासून उमटत आहे. पण शिरसाठ हे नाराज नाहीत. अशा खोट्या बातम्या पेरुन संभ्रमतेचे वातावरण केले जात आहे. आणखी मंत्रिमंडळ विस्ताराचा पुढचा टप्पा बाकी आहे. शिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये कोणी नाराज असूच शकत नाही. त्यामुळे शिंदे सरकार हे अडीच वर्षाचा कालावधी तर पूर्ण करेलच पण एकत्र निवडणुक लढवल्याचा फायदाही होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले आहे.

खातेवाटपही लवकरच होणार

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानुसार आता खातेवाटपही लवकरच होणार आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरुन राजकारण केले जात आहे. मात्र, याचा परिणाम सरकारवर होणार नाही. खातेवाटप ही जबाबदारीने करावी लागते. त्यावरच राज्याचा विकास अवलंबून आहे. त्यामुळे वेळ होत असला तरी जनतेला न्याय मिळेल असाच निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे खातेवाटपही लवकरच होणार असल्य़ाचा विश्वास दानवे यांनी जालन्यात व्यक्त केला आहे.

ही पण बातमी वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.