Party Wise Election Results 2026 Winners LIVE: कोणत्या पक्षाला, आघाडीला किती जागा मिळाल्या? एका क्षणात जाणून घ्या पाच राज्यांचा निकालाची आकडेवारी

All Party Alliance Wise Election Results 2026 and Winners LIVE Updates in Marathi: आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मोठ्या राज्यांच्या निकालांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा पोटनिवडणुकींचे निकालही आज जाहीर होत आहेत.

Party Wise Election Results 2026 Winners LIVE: कोणत्या पक्षाला, आघाडीला किती जागा मिळाल्या? एका क्षणात जाणून घ्या पाच राज्यांचा निकालाची आकडेवारी
Election result Live
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 04, 2026 | 11:10 AM

आज पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उत्साहात सुरुवात झाली आहे. या मोठ्या राज्यांच्या निकालांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा पोटनिवडणुकींचे निकालही आज जाहीर होत आहेत. बारामतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असून, सुरुवातीच्या केवळ तीन फेऱ्यांमध्येच त्यांनी मोठी आघाडी घेत विरोधकांवर दबाव निर्माण केला आहे. दुसरीकडे, राहुरीमध्ये भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात आहेत. राहुरीच्या निकालातही मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून तिसऱ्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांनी १४,७११ मतांची भक्कम आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) गोविंद मोकाटे यांना पिछाडीवर टाकले आहे.

राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये सध्या ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपने येथे प्रचंड ताकद लावली असून भाजपने ८५ जागांवर मुसंडी मारली आहे, तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस ८२ जागांसह त्यांना कडवी झुंज देत आहे. मतमोजणीपूर्वी बिधाननगरसारख्या भागात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याने वातावरण तणावपूर्ण होते, मात्र सध्या कडक सुरक्षा व्यवस्थेत प्रक्रिया सुरू आहे. आसाममध्ये भाजप पुन्हा एकदा आपली सत्ता राखताना दिसत असून तेथे भाजप आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेला १४८ हा आकडा गाठण्यासाठी भाजप आणि टीएमसीमध्ये चुरस वाढली असून, पुढच्या काही तासांत चित्र अधिक स्पष्ट होईल.

Alliance wise election Results:

तामिळनाडूमध्ये निवडणुका झाल्यापासून, जनतेचं लक्ष निकालांवर खिळलं आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर, TVK प्रमुख विजय हे तिरुचिरापल्ली मतदारसंघातून आघाडीवर आहेत. एकूण 22 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच या जागेचा निकाल निश्चित होईल. DMK ही TVK च्या तुलनेत बऱ्याच मागे आहे. केरळमध्ये, सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर असून, त्यांनी 70 जागांचा बहुमताचा आकडा ओलांडला आहे.

Party wise election Results:

Follow Us