AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AMC Election 2022 Ward 25 : अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितचं तगडं आव्हान, प्रभाक क्र. 25 ची स्थिती काय?

महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आलं असल्यानं महापालिका निवडणुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. अशावेळी अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये कोणता पक्ष कुणाला संधी देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

AMC Election 2022 Ward 25 : अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितचं तगडं आव्हान, प्रभाक क्र. 25 ची स्थिती काय?
sagar joshi
sagar joshi | Updated on: Aug 22, 2022 | 12:32 PM
Share

अकोला : विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसचं वर्चस्व मोडित काढत भाजपनं विदर्भात आपले पाय घट्ट रोवले आहेत. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता नागपूर आणि विदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंच्या रुपानं तिसरं नेतृत्व तयार झालंय. पश्चिम विदर्भात भाजप संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे. अकोल्यात मात्र भाजपला वंचित बहुजन आघाडीचं तगडं आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अकोल्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. अकोला मनपा निवडणुकीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असा पालिकेचा प्रवास राहिला आहे. 2017 मध्ये भाजपने मिशन अकोला राबविले. त्यात ते यशस्वीही झाले. 80 पैकी 48 जागांवर ताबा मिळवला होता. यंदा राज्यातील सत्तेचं समीकरण बदललं आहे. महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आलं असल्यानं महापालिका निवडणुकीवरही (Municipal Corporation Election) त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. अशावेळी अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये कोणता पक्ष कुणाला संधी देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक 25 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये एकूण लोकसंख्या 17 हजार 467 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3 हजार 566, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 702 इतकी आहे.

अकोला प्रभाग क्रमांक 25ची व्याप्ती :

स्थळ – हरीहर पेठ, देशपांडे प्लॉट, जयरामसिंग प्लॉट, गाडगे नगर, भोईपूरा, महाकाली नगर, लोकमान्य नगर, भाग्योदय नगर, यशवंत नगर.

उत्तर- बाळापूर रोडवरील मनपा उच्च प्राथमिक उर्दु मुलांची शाळा क्र. 2 पासून किल्ला चौककडे जाणा-या रस्त्याने पुर्वेकडे असदगड किल्ल्यापर्यंत तेथून किल्ल्याचे दक्षिणेकडील बाजूने मोर्णा नदीचे संगमापर्यंत.

पूर्व- असदगड किल्ल्यामागील मोर्णा नदीचे तिरापासून दक्षिणेकडे मोर्णा नदीचे तिराने राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 व मोर्णा नदीच्या संगमापर्यंत.

दक्षिण- राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 व मोर्णा नदीच्या संगमापासून राष्ट्रीय महामार्ग क्रं. 06 ने पश्चिमेकडे सरळ याच मार्गावरील जय गजानन कुलर्स दुकानापर्यंत.

पश्चिम- राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 वरील जय गजानन कुलर्स दुकानापासून उत्तरेकडे हकीमोद्दीने अलीम हुसेन यांचे घरापर्यंत. पुढे हकीमोद्दीने अलीम हुसेन यांचे घराचे उत्तरेकडील रस्त्याने सरळ हरिहर पेठकडे जाणाऱ्या रस्तालगत असलेल्या रोनक स्टील अॅन्ड सिमेट दुकानापर्यंत. तेथून पुढे हरिहरपेठकडे जाणा-या रस्त्याने उत्तरेकडे के.जी. एन. दुकानापर्यंत तेथून पुढे पश्चिमेस रस्त्याने मोर्णा कालव्याजवळील अब्दुल मुजीब यांचे घरापर्यंत तेथून पुढे उत्तरेस मोर्णा कालव्याने शिवसेना वसाहत रस्ता व मोर्णा कालवा यांचे संगमापर्यंत तेथून पुढे शिवसेना वसाहत रस्त्याने उत्तरेकडे स्वराज डेली डिस् पर्यंत आणि पुढे…

प्रभाग क्रं. 25 चे आरक्षण (महाविकास आघाडी सरकारमधील सोडतीनुसार)

अकोला महापालिकेतील प्रभाग क्रमांक 25 मध्ये वार्ड क्रमांक 25 (अ) अनुसूचित जाती, वार्ड क्रमांक 25 (ब) मागासवर्ग प्रवर्ग महिला, तर वार्ड क्रमांक 25 (क) सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...