Video : फडणवीसांना अपमानित करण्यासाठीच केंद्राकडून उपमुख्यमंत्रीपद- प्रकाश आंबेडकर

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री पदी थेट एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. शिवाय या मंत्रीमंडळाचा आपण कोणताच भाग राहणार नसल्याचेही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाचे आदेश येताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Video : फडणवीसांना अपमानित करण्यासाठीच केंद्राकडून उपमुख्यमंत्रीपद- प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
अश्विनी सातव डोके

| Edited By: राजेंद्र खराडे

Jul 01, 2022 | 1:12 PM

मुंबई : (Maharashtra Politics) राज्यातील 10 दिवसाच्या राजकीय नाट्यावर पडदा पडत असताना जो शेवट झाला त्याने सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर काहींनी हा (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे म्हटले तर काहींनी केंद्रीय नेत्यांचे तसे आदेशच असल्याचे तर्क लावले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना अपमानित करण्यासाठीच त्यांना मुख्यमंत्री पद न देता उपमुख्यमंत्री पद दिल्याचे मत (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. भाजपातील केंद्रीय स्तरावरील नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अगदी चांगले असल्याचे बोलले जात होते. पण हा निर्णय फडणवीस यांना अपमानित करण्यासाठी घेतल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून समोर येत आहेत. यामुळे केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस याचं कसं चाललंय या अनुशंगानेही चर्चा रंगू लागली आहे.

विरोधकांच्या प्रतिक्रियेनंतर संभ्रमता

देवेंद्र फडणवीस थेट उपमुख्यमंत्री आणि 40 आमदारांना घेऊन आलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री यामुळे राजकीय नाट्य संपल्यानंतरही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर देवेंद्र फडणवीस यांची देहबोली आणि पडलेला चेहरा पाहून त्यांच्या मनाविरुध्द झाल्याचेही सांगितले पण पक्षाचे आदेश त्यांनी पाळले याचे कौतुकही केले. पण प्रकाश आंबेडकर यांनी मात्र, हे फडणवीस यांना अपमानित कऱण्याच्या हेतून झाल्याचे सांगितले आहे.

मंत्रीमंडळात सहभाग नाही म्हणणारे फडणवीस उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री पदी थेट एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. शिवाय या मंत्रीमंडळाचा आपण कोणताच भाग राहणार नसल्याचेही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाचे आदेश येताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरुन तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांनी मात्र, हे फडणवीस यांना अपमानित करण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शपथविधी होण्यापूर्वी नेमके काय झाले आणि एवढे मोठे निर्णय झाले असा प्रश्न आजही कायम आहे.

हे सुद्धा वाचा

पक्ष वाढवण्यात फडणवीस यांना रस

मंत्रीमंडळात आपला सहभाग राहणार नाही म्हणणाऱ्या फडणवीस यांना आता आगामी काळात पक्ष वाढवण्यासाठी काम करायचे होते. त्याअनुशंगाने माध्यमात चर्चाही सुरु झाली होती. मात्र, अवघ्या काही वेळात त्यांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठांनी त्यांना अपमानित कऱण्यासाठी हे केले की यामागे भाजपाची काय नवी रणनिती आहे हे पहावे लागणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें