AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना चपराक, पवारांसाठी निष्ठावंत सरसावले

औरंगाबादच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खंद्या समर्थकांनी शरद पवारांसोबतची निष्ठा व्यक्त करण्यासाठी असा निर्णय घेतलाय की तो ऐकून प्रत्येक जण थक्क होईल.

पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना चपराक, पवारांसाठी निष्ठावंत सरसावले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 25, 2019 | 4:22 PM
Share

औरंगाबाद : वयाच्या 78 व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या शरद पवारांना (Sharad Pawar supporters) अनेक निष्ठावंत लोक सोडून जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्यावर (Sharad Pawar supporters) गुन्हा नोंदवला आहे. अशाही परिस्थितीत शरद पवारांची ऊर्जा आणखी वाढवणारी बातमी आहे. औरंगाबादच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन खंद्या समर्थकांनी शरद पवारांसोबतची निष्ठा व्यक्त करण्यासाठी असा निर्णय घेतलाय की तो ऐकून प्रत्येक जण थक्क होईल.

मुख्याध्यापकपदाचा राजीनामा देऊन पक्षाचं काम

प्रदीप सोळुंखे.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलचे ते अध्यक्ष आहेत. हे झालं त्यांचं पक्षातलं स्थान, पण व्यक्तिगत आयुष्यात प्रदीप सोळुंखे हे औरंगबाद जिल्ह्यातील शहनुरवाडी इथल्या मराठवाडा शिक्षण मंडळाच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

आपला शिक्षकी पेशा सांभाळून प्रदीप सोळुंखे हे राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करत आले. पण गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. त्यामुळे व्यथित झालेल्या प्रदीप सोळुंखे यांनी थेट आपल्या मुख्याध्यापकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला.

चांगला पगार मिळणाऱ्या आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन एका राजकीय पक्षाचं पूर्णवेळ काम करण्याचा प्रदीप सोळुंखे यांचा हा निर्णय अनेकांना रुचणारा नाही. पण पवार साहेबांच्या प्रेमापोटी हा धाडसी निर्णय घेणारे प्रदीप सोळुंखे महाराष्ट्रातील एकमेव मुख्याध्यापक असावेत. प्रदीप सोळुंखे यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबानेही एकमताने पाठिंबा दिला आहे.

पीएचडी धारकाची साथ न सोडण्याची ग्वाही

दुसरे आहेत दादासाहेब कांबळे. औरंगबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते पीएचडी करतात. विद्यार्थी दशेतच दादासाहेब कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम सुरू केलं. पण ज्या लोकांना शरद पवार यांनी आमदार, खासदार आणि मंत्री केलं, तेच लोक आज शरद पवार यांना सोडून जाऊ लागल्यामुळे व्यथित झालेल्या दादासाहेब कांबळे यांनी थेट 100 रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र करून शरद पवार यांना आयुष्यभर कधीही सोडून न जाण्याचा ग्वाही दिली. दादासाहेब कांबळे यांनी हे शपथपत्र थेट शरद पवार यांना सादर केलं. या शपथपत्राचं शरद पवारांनीही कौतुक केलं.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज लोक शरद पवार यांना सोडून जाऊ लागल्यामुळे विरोधक हे राष्ट्रवादीवर पक्ष संपल्याचा आरोप करत आहेत. तर दुसरीकडे अशाही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करण्यासाठी कुणी शपथपत्र लिहून देत आहेत, तर कुणी आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते प्राण ओतायला तयार असल्याचं समोर येत आहे.

Follow Us
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?