अमित शाहांनी बसल्या बसल्या गेम फिरवला, 4 पक्ष एनडीएत, ताकद किती वाढली?

अमित शहांच्या रणनीतीमुळे NDA ची ताकद लक्षणीय वाढली आहे. शिंदेंची शिवसेना, जेडीयू, टीडीपी आणि शिरोमणी अकाली दलासारखे चार महत्त्वाचे पक्ष पुन्हा एनडीएत सामील झाले आहेत. यामुळे लोकसभेत एनडीएची सदस्यसंख्या वाढली असून, आगामी निवडणुका आणि महत्त्वाच्या विधेयकांसाठी सरकारला अधिक बळ मिळाले आहे.

अमित शाहांनी बसल्या बसल्या गेम फिरवला, 4 पक्ष एनडीएत, ताकद किती वाढली?
amit shah
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 10:05 AM

लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वीच भाजपने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच एनडीएत शिरोमणी अकाली दलाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे लोकसभेत भाजपची ताकद वाढली आहे. 2024 च्या लोकसभेनंतर शिरोमणी अकाली दल, जनता दल युनायटेड, तेलुगु देसम पार्टी आणि शिरोमणी अकाली दल एनडीएत आल्याने एनडीएची ताकद 42 खासदारांनी वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीमुळे ही ताकद वाढल्याचं सांगितलं जात आहे.

2018मध्ये टीडीपी, 2019मध्ये शिवसेना, 2020मध्ये शिरोमणी अकाली दलाने एनडीएची साथ सोडली होती. नितीश कुमार यांच्या जेडीयूचं एनडीएत येणंजाणं चालूच असतं. 2024मध्ये जेडीयू परत एनडीएत आला आहे. 2024 मध्ये शिरोमणी अकाली दलाला सोडून सर्वच पक्ष एनडीएमध्ये होते. त्याशिवाय असाम गण परिषद, एआयएडीएमके सारख्या पक्षांनीही एनडीएतून वेगळं झाल्यानंतर परत घर वापसी केली आहे.

Loading...

सोडून गेले, परत आले

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 240 जागांवर विजयी झाला होता. सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला होता. 2014 आणि 2019 प्रमाणे भाजपने बहुमत मिळवलं नव्हतं. अशावेळी 16 खासदार असलेली टीडीपी, 12 खासदार असलेली जेडीयू आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे केंद्रात भाजपचं सरकार बनलं आणि बहुमताचा आकडाही गाठला गेला.

2024च्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या सात जागा मिळाल्या होत्या. मात्र जून 2026मध्ये त्यांना आणखी सहा खासदारांचं समर्थन मिळाल्याने शिवसेनेचा आकडा 13 वर गेला. संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे शिंदेंच्या नेतृत्त्वात आले.

परिसीमन विधेयक येणार

दरम्यान, 15 डिसेंबर रोजी संसदेचं हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना 15 डिसेंबरपूर्वी संसदेच्या अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मोदींनी 15 डिसेंबर रोजी संसदेचं अधिवेशन बोलवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्री आणि खासदारांना देशाबाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच अधिवेशनात परिसीमनशी संबंधित महिला विधेयक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारला दोन तृतियांश बहुमताची गरज आहे.

वृत्तसंस्थेच्या मते, एनडीएकडे 320 सदस्यांचं बळ आहे. त्यांना दोन तृतियांश बहुमताचा आकडा पार करण्यासााठी अजून सदस्यांची गरज आहे. विरोधकांच्या पाठिंब्याशिवाय सरकार हे विधेयक मंजूर करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. खालच्या सभागृहात 3 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. लोकसभेत एकूण 540 सदस्य असून त्यामुळे 361 सदस्य असल्यास दोन तृतियांशचा आकडा पूर्ण होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us