तोतरी जबान महाविकास आघाडीविरोधात फडफडते, कोल्हापुरच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, किरीट सोमय्यांना कुणाचा इशारा

किरीट सोमय्यांची जबान तोतरी आहे. ज्या पद्धतीने फडफड करते, ती भाजपविरुद्ध फडफड करत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात गरळ ओकत असते, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं.

तोतरी जबान महाविकास आघाडीविरोधात फडफडते, कोल्हापुरच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, किरीट सोमय्यांना कुणाचा इशारा
Image Credit source: social media
| Updated on: Jan 12, 2023 | 12:19 PM

गणेश सोळंकी, बुलढाणाः किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची तोतरी जबान वारंवार महाविकास आघाडीविरोधात (Mahavikas Aghadi) फडफडते. काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात गरळ ओकते. पण यावेळी सोमय्यांचा नेम चुकलाय. शाहूंच्या कोल्हापूरच्या (Kolhapur) मातीशी त्यांनी पंगा घेतलाय. कागलची तांबडी माती ही विखारी वृत्ती गाडल्याशिवाय राहणार नाही, असा जहरी इशारा सोमय्या यांना देण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोमय्यांना अशा शब्दात सुनावलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ईडी आणि आयकर विभागाने काल मुश्रीफ यांच्यासंबंधी अनेक मालमत्तांवर धाडी टाकल्या. यासंबंधी चौकशीसाठी ते येत्या काळात कोल्हापुरात जाणार आहेत. यावरून अमोल मिटकरी यांनी त्यांना सुनावलंय.

अमोल मिटकरी म्हणाले, ‘ ईडी आणि सीबीआय या यंत्रणा केंद्र सरकारच्या गुलाम आहेत. अनिल देशमुखांविरोधात गुन्हे दाखल झाले.. पण अजूनही त्यात तथ्य सापडलं नाही. तसंच हे प्रकरण आहे. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत भावना गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्यावर तसेच मुश्रीफ यांच्यासारखेच आरोप केले होते.

किरीट सोमय्यांची जबान तोतरी आहे. ज्या पद्धतीने फडफड करते, ती भाजपविरुद्ध फडफड करत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात गरळ ओकत असते….

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, ‘ यावेळी सोमय्यांना नेम चुकलाय. त्यांनी हिंदु आणि मुस्लिम असं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे त्यांनी कोल्हापूरच्या शाहूमातीशी पंगा घेतलाय. कागलची तांबडी माती भाजप आणि किरीट सोमय्यांसारख्या विखारी प्रवृत्तींना गाडल्याशिवाय राहणार नाही…

12 जानेवारीला जिजाऊच्या जन्मस्थळावरून हे वक्तव्य करतोय. ईडा-पिडा टळो आणि महाराष्ट्रातलं हे दळभद्री सरकार जावो, बळीराजाचं राज्य येवो, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं.