शेलारमामा, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट रेशीमबागेत मिळेल की भाजप कार्यालयात? मिटकरींनी डिवचले

रेशीमबाग की भाजपा कार्यालय, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट कुठं मिळेल? असा प्रश्न अमोल मिटकरींनी शेलारांना उद्देशून विचारला

शेलारमामा, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट रेशीमबागेत मिळेल की भाजप कार्यालयात? मिटकरींनी डिवचले

मुंबई : शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करणारे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी निशाणा साधला आहे. “शेलारमामा, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट रेशीमबागेत मिळेल की भाजप कार्यालयात?” असा तिखट सवाल मिटकरींनी शेलारांना अप्रत्यक्षपणे विचारला. (Amol Mitkari taunts Ashish Shelar on criticism about Shivsena’s Hinduism)

“हिंदुत्वाची ठेकेदारी फक्त संघ आणि भाजपकडे आहे, असे ‘शेलारमामां’ सांगतात ! मग सेनेव्यतिरिक्त जे सर्वसामान्य हिंदू आहेत, त्यांचं काय? हेही एकदा स्पष्ट करावं! रेशीमबाग की भाजपा कार्यालय, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट नेमकं कुठं मिळेल?” असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन विचारला.

आशिष शेलार काय म्हणाले होते?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मेळाव्यात हिंदुत्वाविषयी मांडलेल्या विचारांचा शिवसेनेकडून विपर्यास करुन सोयीस्कर असा अर्थ काढण्यात आला. सरसंघचालकांची ती व्याख्या म्हणजे हिंदुत्वाची खरी त्वचा आहे. मात्र, शिवसेनेने सत्तेसाठी या त्वचेचा त्याग केला. आता शिवसेनेच्या अंगावर केवळ हिंदुत्वाची शाल पांघरलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाची त्वचा आणि शाल यांची तुलना होऊच शकत नाही, असे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केले

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व म्हणजे अंगावरची कातडी असलेली त्वचा आहे आणि उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्त्वाची शाल सत्तेसाठी काढून टाकली, अशा पद्धतीचं आहे. त्वचा आणि शाल याची तुलना होऊ शकत नाही!” अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. शिवसेनेवरील टीकेला आता राष्ट्रवादीतून उत्तर मिळताना दिसत आहे. (Amol Mitkari taunts Ashish Shelar on criticism about Shivsena’s Hinduism)

“टाळ्या आणि थाळ्या याचा हिंदुत्त्वाशी संबंध नव्हता, तो आपल्या कोरोना योद्धयांचा, कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या सर्व सेवकांचा उत्साह वाढविण्यासाठी टाळ्या आणि टाळ्यांचा विषय होता” असंही आशिष शेलार म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं, खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादीची तोफ’ धडाडली

आमचं हिंदुत्व म्हणजे त्वचा, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी पांघरलेली शाल- आशिष शेलार

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद; शेलारांची खोचक टीका

(Amol Mitkari taunts Ashish Shelar on criticism about Shivsena’s Hinduism)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI