Amravati MLC Election Result 2026 Updates : अमरावतीत मोठा ट्विस्ट, शिंदेंच्या बंडखोरामुळे मोठा उलटफेर; ऐनवेळी आकडे फिरले; निकाल बदलणार?
अमरावतीची जागा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण याच जागेवर सर्वाधिक बंडखोरी झाली होती. त्यामुळे इथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या मतमोजणी सुरू असतानाच मोठा ट्विस्ट आला आहे. एकीकडे शिंदे सेनेच्या उमेदवाराला काहीसा दिलासा मिळालाय.

Amravati MLC Election Result Today : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. आता पुढच्या काही तासांत या निवडणुकीचा निकाल लागणार असून सध्या मतमोजणी सुरू आहे. एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. या जागांपैकी अमरावतीची जागा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण याच जागेवर सर्वाधिक बंडखोरी झाली होती. त्यामुळे इथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या मतमोजणी सुरू असतानाच मोठा ट्विस्ट आला आहे. एकीकडे शिंदे सेनेच्या उमेदवाराला काहीसा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे काँग्रेसला चेकमेट देत शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने आघाडी घेतलीय. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
आतापर्यंत काय माहिती समोर आली?
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल येण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबलवर 14 हजार मतांची मोजणी केली जात आहे. प्रत्येक टेबलवर 1 हजार मतांची मोजणी होत आहे. 14 हजारपैकी 10 हजार मतांची मोजणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.
बंडखोर माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला गेम
एकूण 14 हजार मतांमध्ये महायुतीतून निवडणूक लढवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण सरनाईक हे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवाराला चेकमेट बसला आहे. येथे शिंदे सेनेचे बंडखोर माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकले आहे. काँग्रेसचे उमेदवार आदिती पोहरे या पिछाडीवरच आहेत.
देशपांडेंचा लाभ नेमका कोणाला होणार?
दरम्यान, ही जागा जिंकण्यासाठी महायुतीने चांगलाच जोर लावलेला आहे. इथे पूर्ण ताकदीने प्रचार करण्यात आला होता. शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते श्रीकांत देशपांडे यांची बंडखोरी शमवण्यासाठी खूप प्रयत्न झाले. परंतु त्याला यश आलेले नाही. आता देशपांडे यांच्या उमेदवारीमुळे नेमका कोणाला लाभ होणार, कोणाची मतं फुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्यातरी किरण सरनाईक आघाडीवर आहेत.