AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढदिवशी रुग्णसेवा, खासदार नवनीत राणांचे साधेपणाने सेलिब्रेशन

कोरोना महामारीचा प्रकोप लक्षात घेत शासनाचा ताण हलका करण्याचा निर्णय खासदार नवनीत राणा यांनी घेतला. (Navneet Rana celebrates birthday)

वाढदिवशी रुग्णसेवा, खासदार नवनीत राणांचे साधेपणाने सेलिब्रेशन
नवनीत राणा यांचा साधेपणाने वाढदिवस साजरा
| Updated on: Apr 07, 2021 | 10:06 AM
Share

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Rana) यांनी आपला वाढदिवस रुग्णसेवा दिन म्हणून व्यतीत केला. रुग्णांना भोजन वाटून नवनीत राणा यांनी वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. (Amravati MP Navneet Rana celebrates birthday simple manner with Patients)

खासदारकीच्या पगारातून रुग्णांना जेवण

कोरोना महामारीचा प्रकोप लक्षात घेत शासनाचा ताण हलका करण्याचा निर्णय खासदार नवनीत राणा यांनी घेतला. त्यामुळे खासदारकीच्या पगारातून कोव्हिड सेंटर आणि विलगीकरण कक्षात असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व रुग्णांना भोजनाची पाकिटं वितरित करण्यात आली. शासन निर्देशांचे पालन करुन सर्व साहित्य निर्जंतुक करुन अत्यंत स्वच्छ वातावरणात याचं वितरण करण्यात आलं.

भोजन पाकीट आणि सॅनिटायझर वितरित

अमरावती, तिवसा, धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, परतवाडा, भातकुली, दर्यापूर, चांदुर बाजार येथील कोव्हिड सेंटर आणि विलगीकरण कक्षात भरती असलेल्या रुग्ण व त्यांची सेवा करणाऱ्या आरोग्य सेवक यांना उत्कृष्ट दर्जाचे भोजन पाकीट, सॅनिटायझर वितरित करण्यात आले.

नवनीत राणांचा लॉकडाऊनला विरोध

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यापाऱ्यांचे, गरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व व्यापार बंद आहे, गरीबांचे रोजगार गेले आहेत. ऑटो रिक्षाचालक यांनी ईएमआयवर रिक्षा घेतली, व्यापाऱ्यांनी आपलं इलेक्ट्रिक बिल कसे भरावे, असाही प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला होता.

आता हा लॉकडाऊन लोकांनाही मान्य नाही, त्यामुळे येणारा दिवसात जर लॉकडाऊन लागला तर आम्ही त्याचा विरोध नक्की करु, नियम कडक करा, पण लॉकडाऊन महाराष्ट्रात कुठेच मान्य नाही, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

दीपाली चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त, आरोपींच्या प्रतिमांचं नवनीत राणांच्या हस्ते होलिकादहन

VIDEO | मेळघाटात खासदार नवनीत राणा यांचा कोरकू नृत्यावर ठेका

(Amravati MP Navneet Rana celebrates birthday simple manner with Patients)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.