विधान परिषद निवडणूक: महात्मा गांधींचा आदर्श घेत वाशिमच्या उपेंद्र पाटलांचे विना शर्ट प्रचार अभियान

| Updated on: Nov 26, 2020 | 4:42 PM

अमरावती शिक्षक मतदरासंघातून अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांची प्रचाराची स्टाईल चर्चेचा विषय ठरत आहे. (Amaravati Teacher Constituency )

विधान परिषद निवडणूक: महात्मा गांधींचा आदर्श घेत वाशिमच्या उपेंद्र पाटलांचे विना शर्ट प्रचार अभियान
Follow us on

वाशिम: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. शिक्षक आमदारांचे दुर्लक्ष आणि शासनाची अक्षम्य दिरंगाई, ग्रामीण भागातील शिक्षकांचे सुरू असलेल्या शोषणाचा मुद्दा पुढे करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उपेंद्र बाबाराव पाटील या हाडाच्या शिक्षकाला गृह जिल्हा वाशिममधून मोठे समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे. यवतमाळ जिल्ह्यातही मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उपेंद्र पाटील यांनी शर्ट न घालता दाखल केलेली उमेदवारी आणि निवडणूक प्रचारही विना शर्ट सुरू केल्याने विना अनुदानित शिक्षकांसह सर्वच मतदारांची सहानुभूती मिळत असल्याचे चित्र आहे. (Amravati Teacher Constituency Upendra Patil different style of political campaign)

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचारात आर्थिक अडचणी येत नाहीत. अपक्ष उमेदवारांसमोर आर्थिक पाठबळाचा प्रश्न असतो. विनाअनुदानित शाळांच्या सन्मानासाठी लढणाऱ्या उपेंद्र पाटील यांना उमेदवाराला शिक्षक मतदार स्वतःहून आर्थिक मदतही करीत आहेत.अनेक ठिकाणी शिक्षक मतदार भगिनी त्यांना ओवाळून एक वोट आणि एक नोट असा शब्दही देतायत. मात्र, मतदानादिवशी हे समर्थन टिकून राहील का हे पाहाव लागणार आहे.

प्रचारासाठी अनोखा मार्ग

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील धामणी इथल्या उपेंद्र पाटील यांची शर्टलेस प्रतिमा आता प्रचाराचा सिम्बॉल बनला असून ते जिथे जातात तिथे मतदार स्वतः शर्ट काढून त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. राजकीय पक्षांनी या निवडणुकीत उडी घेऊन जो राजकीय आखाडा बनवून टाकला त्याचा राग असणारा मोठा मतदार वर्ग उपेंद्र पाटील यांच्या आगळ्या वेगळ्या प्रचार कडे झुकणार का हे बघावं लागणार आहे. (Amravati Teacher Constituency Upendra Patil different style of political campaign)

11 वेळा आमदार, 95 वर्षीय गणपतराव देशमुखांच्या भेटीला चंद्रकांत पाटील, कारण…

वसंतराव विद्यालय, वरोली येथे विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न मांडणारे उमेदवार उपेंद्र बाबाराव पाटील यांनी भेट दिली असता येथील शिक्षकांनी स्वतःहून शर्ट काढून उपेंद्र पाटील यांना पाठिंबा दिला. वसंतराव विद्यालय, वरोली या ठिकाणी जे कर्मचारी 2003 पासून नोकरीवर लागले ते आता फक्त 20 टक्के अनुदानावर आहेत. सतरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा 20 टक्के अनुदान ते घेत आहेत. 2000-01 च्या दरम्यान रुजू झालेले शिक्षक मात्र शंभर टक्के अनुदान घेत आहेत.

एकाच शाळेत अर्धे शिक्षक शंभर टक्के अनुदान घेतात आणि अर्धे 20 टक्के अनुदान घेतात. 20 टक्के अनुदानित शिक्षकांना शंभर टक्के अनुदान आणि पेन्शन मिळण्याकरता उमेदवारी दाखल केल्याचे उपेंद्र पाटील यांनी सांगितले. माझ्या 20% अनुदान मिळणाऱ्या बांधवांना कुटुंब चालवावे लागते, याचा त्रास आम्हाला शंभर टक्के अनुदानित शिक्षकांना होतो, असं उपेंद्र पाटील म्हणाले.

एक भाऊ तुपाशी तर एक भाऊ उपाशी अशी परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्यामुळे शिक्षण क्षेत्र ढवळून निघालेल्या आहे. महात्मा गांधींनी आपल्या अंगावरील कपडे काढून स्वातंत्र्याची लढाई लढली तसेच अंगावरील शर्ट काढून शिक्षण क्षेत्रामध्ये लागलेली कीड दूर करण्यासाठी विडा उचलला आहे. निवडून आल्यानंतर सभागृहात शर्ट घालणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली असल्याचे उपेंद्र पाटील सांगत आहेत. (Amravati Teacher Constituency Upendra Patil different style of political campaign)

जिल्हानिहाय मतदारांची संख्या….

अमरावती- 10386 ,अकोला – 6480,वाशिम -3813  बुलढाणा -4784 ,यवतमाळ – 7459,एकूण – 35622


संबंधित बातम्या: 

Special Report | अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपमध्येच संभ्रम!

अमरावती शिक्षक मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : पक्ष की बहीण? भाजप नेत्यासमोर द्विधा, लढत चौरंगी

अमरावती शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; मविआ, भाजपविरोधात भाजप नेत्याची बहीणही रिंगणात

(Amravati Teacher Constituency Upendra Patil different style of political campaign)