अमरावती शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; मविआ, भाजपविरोधात भाजप नेत्याची बहीणही रिंगणात

भाजप-महाविकास आघाडीसोबत माजी कृषीमंत्र्यांची बहीण, शिक्षक महासंघ, शिक्षक भारती संघटनांमुळे लढत बहुरंगी होणार

अमरावती शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; मविआ, भाजपविरोधात भाजप नेत्याची बहीणही रिंगणात
अनिश बेंद्रे

|

Nov 12, 2020 | 3:15 PM

अमरावती : अमरावती विभागात होत असलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 19 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे नितीन धांडे, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. याशिवाय माजी कृषीमंत्र्यांची बहीण, शिक्षक महासंघ, शिक्षक भारती संघटना यांच्या उमेदवारीमुळे ही लढत बहुरंगी होणार आहे. (Amravati Teacher Constituency Election Key Candidates)

गेल्या 14 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले शेखर भोयर शिक्षक महासंघाकडून निवडणूक लढवत आहेत. विनाअनुदानित शिक्षकासाठी काम करणाऱ्या संगीता शिंदे, शिक्षक भारती संघटनेचे दिलीप निभोरकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक मतदारसंघात केलेल्या कामावरुन आपला विजय निश्चित आहे. अनेक शिक्षकांच्या समस्यांचं निराकरण केलं, त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर असल्याची प्रतिक्रिया विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

विद्यमान आमदारांनी गेल्या सहा वर्षात शिक्षकांच्या कुठल्याही प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे यावेळी आपला विजय निश्चित आहे. कारण गेल्या बारा वर्षांपासून आपण सातत्याने शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे प्रतिस्पर्धी कोणी नाही, असा विश्वास शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : भाऊ-बहिणीच्या नात्यात पक्ष आडवा, माजी कृषीमंत्री गहिवरले

शिक्षकांच्या समस्या आतापर्यंत शिक्षक भारती संघटनेने सोडवल्या असून यापुढेही आम्हीच त्यांच्या समस्या सोडवू, असे शिक्षण भारतीचे उमेदवार दिलीप निभोरकर म्हणाले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ
प्रमुख उमेदवार

विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे (शिवसेना – महाविकास आघाडी)
नितीन धांडे (भाजप)
दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती)
शेखर भोयर (शिक्षक महासंघ)
संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) – भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांची बहीण )
प्रकाश काळबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

विभागात एकूण मतदान केंद्र : 77
अमरावती शिक्षक मतदारसंघात 5 जिल्हे येतात
अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा

(Amravati Teacher Constituency Election Key Candidates)

जिल्हानिहाय मतदार
अमरावती : 10 हजार 88
अकोला : 6 हजार
बुलडाणा : 7 हजार 422
वाशिम : 3 हजार 773
यवतमाळ : 7 हजार 407

एकूण : 34 हजार 690 मतदार

पाहा व्हिडीओ :

 

संबंधित बातम्या :

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क कुणाला?; कसा येतो आमदार निवडून?

(Amravati Teacher Constituency Election Key Candidates)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें