भाऊ-बहिणीच्या नात्यात पक्ष आडवा, माजी कृषीमंत्री गहिवरले

चेतन पाटील, Tv9 मराठी

चेतन पाटील, Tv9 मराठी | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Nov 12, 2020 | 3:03 PM

भाजपचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली

भाऊ-बहिणीच्या नात्यात पक्ष आडवा, माजी कृषीमंत्री गहिवरले

अमरावती : अमरावती विभागात होऊ घातलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आपल्या भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या संगीता शिंदे आणि माजी आमदार अनिल बोंडे हे दोघेही गहिवरले. (Anil Bonde and Sangita Shinde get emotional )

वडील आणि भावाचे पाय धुऊन संगीता शिंदे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी दोघांचे बहीण भावाचे अतूट प्रेम दिसून आलं. एकीकडे अनिल बोंडेंसाठी त्यांचा भाजप पक्ष तर दुसरीकडे बहीण असाच पेच निर्माण झाला आहे. मात्र, मी पक्षासाठी काम करेन, भाजप उमेदवार नितीन धांडेंनाही मी भाऊ म्हणून आशीर्वाद दिला आहे, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे त्यांनी व्यक्त केली.

माझे भाऊ भाजपचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहतील. पण मला लहान बहीण म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला आहे, असं मत संगीता शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. या बहीण-भावंडांच्या प्रेमाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

यामुळे आता निवडणुकीत बोंडे आपल्या पक्षाचे उमेदवार नितीन धांडेंसाठी काम करतील की बहिणीला दिलेला आशीर्वाद पूर्ण करतील हा चर्चेचा विषय ठरला आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ प्रमुख उमेदवार

विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे (शिवसेना – महाविकास आघाडी) नितीन धांडे (भाजप) दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) शेखर भोयर (शिक्षक महासंघ) (Anil Bonde and Sangita Shinde get emotional ) संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) – भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांची बहीण ) प्रकाश काळबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

संबंधित बातम्या : 

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर, कोणाला संधी?

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे समर्थकाला औरंगाबादेतून तिकीट

(Anil Bonde and Sangita Shinde get emotional )

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI