AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीवर रात्रभर खलबतं!! ऋतुजा लटके गैरहजर?

या बैठकीला शिवसेना नेते कमलेश राय यांच्यासह प्रमोद सावंतही उपस्थित होते. शिवसेनेच्या प्लॅन बी मधील उमेदवारांमध्ये या नेत्यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय.

मातोश्रीवर रात्रभर खलबतं!! ऋतुजा लटके गैरहजर?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 13, 2022 | 11:19 AM
Share

विनायक डावरुंग, मुंबईः उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर (Matoshree) रात्री उशीरापर्यंत बैठकांचं सत्र सुरु होतं.  अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By Poll) मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचं वातावरण चांगलंच तापलंय. पक्षाचं नाव, चिन्ह यापासून अगदी उमेदवार उभा करण्याच्या प्रक्रियेसाठी शिवसेनाला कोर्टात धाव घ्यावी लागतेय. शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना निवडणुकीत उतरण्याआधी महापालिकेतील लिपिक पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. मात्र हा राजीनामा पालिकेकडून स्वीकारण्यातच येत नाहीये.

त्यामुळे शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आहे. लटके यांच्या राजीनाम्यावर काही वेळातच सुनावणी होईल. मात्र ऋतुजा लटके यांचा रामीनामा मंजूर झाला नाहीतर शिवसेनेचा प्लॅन बी काय आहे, याची जोरदार चर्चा सुरु आहे.

याच संदर्भाने शिवसेना प्रमुखांच्या मातोश्री या निवासस्थानी रात्रभर महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकांना ऋतुजा लटके यांचा मुलगा उपस्थित होता. मात्र त्या स्वतः बैठकीला गैरहजर होत्या.

त्यामुळे लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर त्यांची कशा प्रकारे समजूत घालायची, याविषय़ी बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. तसेच शिवसेनेचे या जागेसाठी पुढील उमेदवार कोण, याविषय़ी देखील चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

या बैठकीला शिवसेना नेते कमलेश राय यांच्यासह प्रमोद सावंतही उपस्थित होते. शिवसेनेच्या प्लॅन बी मधील उमेदवारांमध्ये या नेत्यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय.

ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आधी सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भाजप दबाव टाकतंय. त्यामुळे ते राजीनामा मंजूर करून घेत नाहीयेत, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा लटके यांनी दोन वेळा राजीनामा पत्र सादर केले. मात्र पहिल्या पत्रात निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत राजीनाम्याची अट शिथिल करावी, असं म्हटलंय. तर नंतरच्या 3 सप्टेंबर रोजीच्या पत्रात लवकरात लवकर राजीनामा मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

त्यांच्या अर्जातील या दोन वेगवेगळ्या विनंत्यांमुळेच राजीनामा अडकवून ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...