आंध्र सरकारचा ‘कार’नामा, ब्राम्हण युवकांना स्विफ्ट डिझायर देणार

हैदराबाद: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्याची एकही संधी राजकीय पक्ष सोडत नाहीत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात टीडीपी सरकारने अशीच एक घोषणा केली आहे. चंद्राबाबू नायडू सरकार ब्राम्हण युवकांना कार वाटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला 30 बेरोजगार ब्राम्हण युवकांना ही कार […]

आंध्र सरकारचा ‘कार’नामा, ब्राम्हण युवकांना स्विफ्ट डिझायर देणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

हैदराबाद: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्याची एकही संधी राजकीय पक्ष सोडत नाहीत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात टीडीपी सरकारने अशीच एक घोषणा केली आहे. चंद्राबाबू नायडू सरकार ब्राम्हण युवकांना कार वाटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला 30 बेरोजगार ब्राम्हण युवकांना ही कार देण्यात येणार आहे.

‘स्वयंम रोजगार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारवाटप करण्यात येणार आहे. हे कारवाटप पूर्णपणे मोफत नसून, लाभार्थ्यांना कारच्या किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे. युवकांना स्विफ्ट डिझायर ही कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ब्राम्हण क्रेडिट सोसायटीकडून या कारसाठी 2 लाखांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे. ब्राह्मण वेलफेयर कॉर्पोरेशन या संस्थेकडून युवकांना अनुदानही देण्यात येणार आहे. ‘स्वयंम रोजगार’च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 50 कार वाटण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एका नियोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या हस्ते युवकांना कारच्या चाव्या देण्यात येतील. आंध्र प्रदेश सरकारने एक पाऊल पुढे टाकत, 40 लाख स्मार्टफोनही बेरोजगार युवकांना वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

एनडीएतून बाहेर पडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मोदींच्या मागे हात धुवून लागले आहेत. मोदींना टार्गेट करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. राज्यात सीबीआयला बंदी घालत, चंद्राबाबू नायडू यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना टार्गेट केलं होतं. आता नायडू सरकारचं मोफत कारवाटपही मतदारांना आकर्षित करण्यासोबतच मोदी सरकारला टार्गेट करण्याचा एक नवा खेळ असल्याचं बोललं जात आहे.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.