प्रचारतोफा थंडावल्या, गोटेंच्या एन्ट्रीने धुळ्यात चुरस वाढली!

धुळे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर महाराष्ट्रासह देशभरातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी या टप्प्यात निवडणूक होणार आहे. या जागांपैकी सर्वात उत्सुकतेची लढत म्हणजे धुळे मतदारसंघातील तिरंगी लढत आहे. धुळे मतदारसंघात आमदार अनिल गोटेंच्या एन्ट्रीमुळे येथील निवडणूक रंगली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 28 उमेदवार …

, प्रचारतोफा थंडावल्या, गोटेंच्या एन्ट्रीने धुळ्यात चुरस वाढली!

धुळे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर महाराष्ट्रासह देशभरातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी या टप्प्यात निवडणूक होणार आहे. या जागांपैकी सर्वात उत्सुकतेची लढत म्हणजे धुळे मतदारसंघातील तिरंगी लढत आहे. धुळे मतदारसंघात आमदार अनिल गोटेंच्या एन्ट्रीमुळे येथील निवडणूक रंगली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 28 उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी  खरी लढत काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील आणि भाजपतर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, तसेच भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे धुळे मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

आमदार अनिल गोटे यांचे धुळे मतदारसंघात वर्चस्व आहे. गोटे विद्यमान आमदार आहेत. गेले काही दिवस भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असलेले गोटे थेट भाजपच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र गोटेंच्या बडखोरीमुळे नेमका भाजपला किती मतांचा फटका बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघ, उत्तर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. 6 विधानसभा क्षेत्र या मतदारसंघात आहे. 1996 ते 2014 पर्यंत सलग 18 वर्ष भाजपचे वर्चस्व धुळे लोकसभा मतदारसंघात आहे. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी धुळे लोकसभआ मतदारसंघातून शिवेसेनेतून भाजपात गेलेले डॉ. सुभाष भामरे यांनी शिरपूरच्या अमरीश पटेल यांचा पराभव करत विजयी झाले होते. यावेळी भामरेंना 5 लाख 29 हजार 450 मतं मिळाली होती. सलग 18 वर्ष भाजपचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले असले तरी आजवर या मतदार संघात विकास झालेला नाही.

धुळे लोकसभा मतदार संख्या

धुळे लोकसभा मतदारसंघात 19 लाख 4 हजार 59 एवढी मतदार संख्या आहे. यात महिला मतदार संख्या 9 लाख 10 हजार 935, तर पुरुष मतदार संख्या 9 लाख 93 हजार 903 इतकी आहे. नवं मतदार संख्या जवळपास एक लाख आहे. तसेच तृतीय पंथीय मतदार संख्या 21 आहे.

कोणकोणत्या मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान?

29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *