AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab : राष्ट्रवादीला हाताशी धरून अनिल परब शिवसेना संपवत आहेत, योगेश कदम यांचा पुन्हा गंभीर आरोप

आता योगेश कदम यांनीही पुन्हा अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब हे राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेना संपवत आहेत, असा थेट आरोप योगेश कदम यांनी केलाय.

Anil Parab : राष्ट्रवादीला हाताशी धरून अनिल परब शिवसेना संपवत आहेत, योगेश कदम यांचा पुन्हा गंभीर आरोप
राष्ट्रवादीला हाताशी धरून अनिल परब शिवसेना संपवत आहेत, योगेश कदम यांचा पुन्हा गंभीर आरोपImage Credit source: tv9
| Updated on: Jul 09, 2022 | 5:10 PM
Share

रत्नागिरी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत अनिल परब (Anil Parab) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अनिल परब हे शिवसेना संपवायला निघालेत, असंही रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर आता अलीकडेच राज्यात एकनाथ शिंदे यांचा बंड झालं आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला एक मोठा गट शिंदेंसोबत गेला आणि राज्यात नवं सरकार उदयाला आलं. शिंदेंसोबत गेलेल्या या गटात आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) हेही होते. आता योगेश कदम यांनीही पुन्हा अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब हे राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेना संपवत आहेत, असा थेट आरोप योगेश कदम यांनी केलाय. त्यामुळे पुन्हा अंतर्गत मतभेदांना उत आला आहे.

आदित्य ठाकरे यांना कल्पना होती

मी गुवाहाटीला पळून गेलेलो नाही. मी इथे जातोय याची कल्पना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना दिली होती. पालकमंत्री अनिल परब हे माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेनेला संपवत होते, या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मी एकनाथ शिंदे गटात सामील होताना शिवसेना नेते रामदास कदम यांना देखील सांगितलं होतं. तिथे गेल्यानंतर देखील मी वडील या नात्याने रामदास कदम यांच्या संपर्कात होतो. असे योगेश कदम म्हणाले आहेत.

अनिल परब शिवसेना संपवत होते

रामदास कदम या साऱ्या राजकीय घडामोडीत मला सल्ले देत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर माझ्यासह अनेक आमदार पुढचे चार-पाच दिवस झोपलेले नाहीत. अनिल परब माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मी पराभूत केलेल्या उमेदवाराला मदत करत होते, असा आरोप ही योगेश कदम यांनी केला आहे.

गुवाहाटीत राहणं सोपं नव्हतं

तसेच गुवाहाटी मधील बारा दिवस कुटुंबापासून वेगळं राहणं हे फार अवघड होतं. मुंबईत परतल्यानंतर माझ्या कुटुंबाला गुपचूप हॉटेलवर बोलवून घेतलं आणि मी माझ्या मुलीला भेटलो, अशी आठवणी त्यांनी या बंडातली सांगितली आहे.

कोकणाला मंत्रिपदं मिळणार

तसेच कोकणाला नक्कीच मंत्रीपद मिळेल. कोकणात शिवसेनेचा झंजावत पुन्हा दिसणार आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना आमच्या अजूनही हृदयातच आहे. असा विश्वास ही योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. तसेच गुवाहाटीला जाण्याअगोदर एकनाथ शिंदे संपर्कात होते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.