इकडे खडसेंना नोटीस, तिकडे अंजली दमानिया ED आणि सीबीआयलाच कोर्टात खेचण्याच्या तयारीत

| Updated on: Dec 26, 2020 | 2:51 PM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी, सीबीआय आणि पोलीस यांचा सर्रास वापर राजकारणात होतो. त्याविरोधात आवाज उठवायला हवा.

इकडे खडसेंना नोटीस, तिकडे अंजली दमानिया ED आणि सीबीआयलाच कोर्टात खेचण्याच्या तयारीत
अंजली दमानिया
Follow us on

मुंबई : एकीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ED ने नोटीस (Eknath Khadse) पाठवल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आता थेट ईडी आणि CBI यांनाच कोर्टात खेचण्याचा पवित्रा घेतला आहे. ईडी, (ED) सीबीआयविरोधात (CBI) कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती, अंजली दमानिया यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. “खडसेंनी आपल्याला नोटीस मिळाली नाही असं म्हटलंय. पण याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही, मी कोर्टात याचिका दाखल करणार आहे”, असं दमानियांनी सांगितलं. (Anjali Damania is preparing to take ED and CBI to court Eknath Khadse)

अंजली दमानिया म्हणाल्या, “ईडी, सीबीआय आणि पोलीस यांचा सर्रास वापर राजकारणात होतो. एनडीए किंवा भाजप सगळ्यांनीच या यंत्रणांचा वापर केला. खडसेंनी आपल्याला नोटीस मिळाली नाही असं म्हटलंय. पण याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. आमच्या दोन याचिका कोर्टात आहेत. ईडीने याची सर्रास चौकशी करावी. ईडीने स्टेटमेंटसाठी बोलावलं की मी नक्कीच जाणार”.

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीकडून यंत्रणांचा गैरवापर

उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) व्हीआयडीसी प्रकरणात क्लीन चाट दिली, आमचं प्रकरण केआयडीसीबद्दल आहे जे कोर्टात आहे. त्यात सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचं नाव आहे. त्याचा लढा मी सुरुच ठेवणार पण घाणेरड्या राजकारणात मला पडायचं नाही, असंही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं.

तिन्ही मोठे पक्ष, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी हे तिघेही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात, आणि बदनाम आमच्यासारख्यांना करतात, जे भ्रष्टाचाराचा लढा देत आहेत, असं त्या म्हणाल्या.

मी 2016 पासून लढतेय. आता ईडीला जाग आली का ? त्यांनी खुशाल चौकशी करावी. खरं तर लोकांनी एकत्र येत ईडी आणि सीबीआयविरोधात उभं राहायला हवं, सर्रास गैरवापर होत असेल तर कोर्टात ईडी, सीबीआयविरोधात याचिका दाखल करायला हवी, मी स्वत: याबद्दल विचार करणार, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस 

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (5 reasons behind ED notice to NCP leader Eknath Khadse) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवल्याचं (ED Notice) वृत्त आहे. ईयर एण्ड अर्थात वर्षाअखेरिला म्हणजे 30 डिसेंबरला खडसेंना (ED notice to Eknath Khadse) चौकशीसाठी बोलावणं धाडल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’ने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एकनाथ खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. ही नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले.

(Anjali Damania is preparing to take ED and CBI to court Eknath Khadse)

संबंधित बातम्या 

एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे