AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाचा नेता भाजपाच्या गळाला; माजी आमदार करणार पक्षात प्रवेश

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता ठाकरे गटाचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

ठाकरे गटाचा नेता भाजपाच्या गळाला; माजी आमदार करणार पक्षात प्रवेश
Image Credit source: TV9
| Updated on: Oct 14, 2022 | 10:20 AM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv sena) उठाव केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक नेते, आमदार, खासदार, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनीही धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानं चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे. आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाही तर भाजपाने धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार अवधूत तटकरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दुसरीकडे नेत्यांचे शिंदे गट आणि भाजपात प्रवेश सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

कोण आहेत अवधूत तटकरे?

अवधूत तटकरे हे ठाकरे गटाचे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तसेच ते राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे आहेत. अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात प्रवेश करतील. एकीकडे कोकणात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे. मात्र दुसरीकडे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार अवधूत तटकरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

दुसरीकडे मुंबईतही उद्धव ठाकरे यांना रोखण्यासाठी भाजपकडून रणनीती तयार करण्यात आली आहे.  त्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नारायण राणेंचे आज मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम होणार आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?