मी आधीच सांगितलं होतं……. : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देताना, आपण आधीच म्हटलं होतं की क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतो, असं सांगितलं.

मी आधीच सांगितलं होतं....... : नितीन गडकरी

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रात रातोरात राजकीय भूकंप पाहायला मिळाला.  भल्या पहाटे महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांना शपथही देण्यात आली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  दरम्यान, याबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari on cricket and politics) यांनी प्रतिक्रिया देताना, आपण आधीच म्हटलं होतं की क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतो, असं सांगितलं. (Nitin Gadkari on cricket and politics)

नितीन गडकरी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी मी ‘राजकारण आणि क्रिकेट यात काहीही अशक्य नाही’, असं बोललो होतो ते खरं ठरलं, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले ते स्थिर सरकार असेल, हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा मला विश्वास आहे, माझ्या नवीन सरकारला शुभेच्छा”

नवी दिल्लीतील कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते, क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, हातातली मॅच जात आहे, असं वाटत असतानाच बाजी पलटते, असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं.

‘क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. कधीतरी तुम्हाला वाटतं सामना तुमच्या हातून निसटत चालला आहे. पण अंतिम निकाल अगदी उलट लागतो. मी दिल्लीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाशी माझा फारसा संबंध येत नाही’ असं गडकरी म्हणाले होते.

संबंधित बातम्या   

मॅच हातातून गेली, असं वाटत असतानाच बाजी पलटते : गडकरी 

भाजप- शिवसेनेच्या विचारधारेत आजही फरक नाही : नितीन गडकरी  

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI