AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022 Ward 29 : अमरावती महापालिका निवडणुकीत कुणाचं पारडं जड? प्रभाग क्रमांक 29 साईनगरमध्ये कोण बाजी मारणार?

अमरावती महापालिकेत (ARMC Election 2022 ) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

ARMC Election 2022 Ward 29 : अमरावती महापालिका निवडणुकीत कुणाचं पारडं जड? प्रभाग क्रमांक 29 साईनगरमध्ये कोण बाजी मारणार?
| Updated on: Aug 19, 2022 | 11:07 PM
Share

अमरावती : राज्यातील सत्ता पालटानंतर महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं (Local Body Elections) वातावरण बदललं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे राज्यात शिवसेना कमकुवत झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. अशावेळी आगामी महापालिका निवडणुकांकडे (Municipal Elections) संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विदर्भातील राजकारणात अमरावती महापालिकेला महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे या महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशिल असतात. अमरावती महापालिकेत (ARMC Election 2022 ) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. अशावेळी अमरावती महापालिकेतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळणार? आणि कोण बाजी मारणार? याकडे अमरावतीकरांचं लक्ष असेल.

अमरावती महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार अमरावती महापालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्या 6 लाख 47 हजार 57 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 11 हजार 435, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 15 हजार 955 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या (2011च्या जनगणनेनुसार)

प्रभाग क्रमांक 29 मध्ये एकूण लोकसंख्या 19 हजार 516 आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 754 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 442 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 29 साईनगर मधील वार्डांचं आरक्षण

प्रभाग क्रमांक 29 मध्ये एकूण तीन वार्ड आहेत. त्यात वार्ड क्र 29 (अ) सर्वसाधारण महिला, वार्ड क्र 29 (ब) सर्वसाधारण महिला, तर वार्ड क्र 29 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.

प्रभाग क्रमांक 29 साईनगरची व्याप्ती :

सातुर्णा स्लम, सातुर्णा औ. वसाहत, आय. टी. आय. कॉलनी, घनश्याम नगर, प्रोफेसर कॉलनी, सिद्धीविनायक कॉलनी, पटेल नगर, खंडेश्वर कॉलनी, वृंदावन कॉलनी, साई नगर, महेश नगर, चंद्रावती नगर, भक्तीधाम मंदिर परिसर, दंदे लेआऊट, भिमज्योती कॉलनी, महाबँक कॉलनी. विद्युत कॉलनी, भरत नगर, सानेगुरुजी नगर, फॉरेस्ट कॉलनी, भेरडे लेआऊट, संजीवनी नगर, अडवानी लेआऊट, खंडेलवाल लेआऊट, अकोली गाव परिसर व इत्यादी.

उत्तर : मनपा हद्द व चांदुरी रोड जंक्शन पासून पूर्वेस सडकेने मौजा अकोली सर्वे क्रमांक ४ च्या हद्दीपर्यंत तेथून उत्तरेस न्यू अमरावती रेल्वे स्टेशन पर्यंत जेथून उत्तरेस व ईशाना दिशेने अोली रेल्वे स्टेशन रोड जंक्शन पर्यंत रोवून पूर्वेस डि. पी. रोसने बडनेरा रोड पर्यंत म्हणजेच शातुर्णा बस स्टॉप पर्यंत तेथून उत्तरेस सडकेने नवाथे नाला पुलापर्यंत तेथून नाल्याने चक्रधर नगर रेल्वे नाला पुलापर्यंत.

पूर्व : चक्रधर नगर रेल्वे नालापूलापासून दक्षिणेस रेल्वे लाईनने गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग पर्यंत तेथून पश्चिमेस सडकेने गोपाल नगर स्टॉप पर्यंत तेथून दक्षिणेस सडकेने शशी नगर नाला पुलापर्यंत.

दक्षिण : शशी नगर नाला पुलापासून पश्चिमेस नाल्या नाल्याने मौजा बडनेरा सर्वे क्र. २९५च्या ईशान्य कोप-या पर्यंत तेथून उत्तरेस मनपा हद्दी पर्यंत.

पश्चिम : मनपा हद्द.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.