AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanaji Sawant : आरोग्यमंत्री गेले अन् युवा सेनेने गोमुत्र शिंपडले, सावंत-सेना वाद सुरुच

तानाजी सावंत आरोग्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते. त्यांनी पंढरपूर तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला. शिवाय जिथे कर्मचाऱ्यांचा अभाव आहे त्या ठिकाणी लागलीच पदभरती करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केवळ अधिकारी कर्मचाऱ्यांना दोष न देता त्या भागातील समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा दौरा असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

Tanaji Sawant : आरोग्यमंत्री गेले अन् युवा सेनेने गोमुत्र शिंपडले, सावंत-सेना वाद सुरुच
आरोग्यमंत्री तानाजी सावंत मार्गस्थ होताच त्या रोडवर गोमुत्र शिंपडून तो रस्ता युवा सेनेकडून शुद्ध कऱण्यात आला आहे.
| Edited By: | Updated on: Sep 05, 2022 | 6:41 PM
Share

सोलापूर :  (Shivsena Party) शिवसेना आणि (Rebel MLA) बंडखोर आमदार यांच्यातील मतभेद हे थांबता-थांबेना झाले आहेत. विशेष म्हणजे बंडखोरातील काही आमदार हे शिवसेनेच्या रडावरच असल्याचे चित्र आहे. यामध्ये हिंगोलीचे संतोष बांगर आणि भूम-परंडा- वाशी मतदार संघाचे (Tanaji Sawant) आ. तानाजी सावंत यांचा उल्लेख करावा लागणार आहे. आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर तानाजी सावंत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. मध्यंतरी या जिल्ह्याचे ते संपर्कप्रमुखही होते. सोलापूर जिल्ह्यातील विविधा आरोग्य केंद्रांना आणि इतर रुग्णालयांना त्यांनी भेटी देऊन पाहणी केली आणि सेवेचा आढावाही घेतला. हा त्यांचा दौरा राजकारण विरहीत होईल असे वाटत असतानाच युवासेनेच्या माध्यमातून तर वेगळ्याच पद्धतीने तानाजी सावंत यांना विरोध करण्यात आला आहे. दरम्यान, तानाजी सावंत ज्या रोडवरुन मार्गस्थ झाले आहेत, त्या रस्त्यावर गोमुत्र शिंपडून त्या रस्त्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे.

नातेपुतेमध्ये युवा सेनेकडून निषेध

आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे दाखल झाले होते. ग्रामीण रुग्णालयाती आढावा घेऊन ते पंढरपुराकडे मार्गस्थही झाले. पण ते ज्या मार्गाने आले तो रस्ता देखील अशुध्द झाल्याचा ठपका ठेवत युवा सेनेच्यावतीने त्या रस्त्याचे शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी युवा सेना सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, अमोल उराडे,रुपेश लाळगे, अमित भरते उपस्थित होते.

आरोग्य विभागाचा आढावा

तानाजी सावंत आरोग्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते. त्यांनी पंढरपूर तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला. शिवाय जिथे कर्मचाऱ्यांचा अभाव आहे त्या ठिकाणी लागलीच पदभरती करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केवळ अधिकारी कर्मचाऱ्यांना दोष न देता त्या भागातील समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा दौरा असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. सुरावातीला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील विविधा आरोग्य केंद्रांना त्यांनी भेटी देऊन तेथील आढावा घेतला.

थेट रुग्णांशी संवाद

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज माळशिरस तालुक्यातील नातेपुते ग्रामीण रुग्णालयास भेट दिली.उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करीत ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता आणि इतर सोयीसुविधा बद्दल त्यानी झाडाझडती घेतली. एवढेच नाहीतर रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच राज्यात कोरोना , स्वाईन फ्लू अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे साथीचे आजार नाहीत. अशा प्रकारच्या सर्व आजारांबाबत आरोग्य विभाग सतर्क असावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.