शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढणार? बॅनरबाजीतून आमदार आशिष शेलारांची खिल्ली, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Dec 12, 2021 | 5:12 PM

आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावलं आहे. या बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय.

शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढणार? बॅनरबाजीतून आमदार आशिष शेलारांची खिल्ली, नितेश राणेंचं प्रत्युत्तर
किशोरी पेडणेकर आणि आशिष शेलारांच्या वादाचे विधानसभेत पडसाद
Follow us on

मुंबई : राज्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर शेलार यांनीही हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयात (High Court) सादर केलाय. त्यानंतर आता आशिष शेलार यांच्याविरोधात बॅनरबाजी करत त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील पुन्हा एकदा रंगण्याची चिन्ह आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला. मग शेलार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर सेना-भाजपमधील वाद शमत असतानाच आता पुन्हा एकदा शेलार आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळतंय. आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावलं आहे. या बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय.

कोणत्या शब्दात शेलारांना डिवचण्याचा प्रयत्न?

कसं काय शेलार बरं हाय का?

काल काय एैकलं ते खरं हाय का?

काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला.

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला?

नितेश राणेंचं शिवसेनेला प्रत्युत्तर

दरम्यान, या बॅनरबाजीवरुन भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार केलाय. किशोरी पेडणेकरांबद्दल आशिष शेलार यांनी जे म्हटलेलं नाही त्याबद्दल शिवसेनेला जास्तच मर्दानगी सुचलेली आहे. रात्रीच्या वेळी येऊन बॅनर लावायचे आणि स्वतःला वाघ म्हणून म्याव- म्याव करायचं अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. नाच्याचा उरलेला पक्ष म्हणजे शिवसेना. त्या पक्षात वरपासून खालपर्यत सर्व नाचेच भरलेले आहेत. पुढच्या वेळी बॅनर लावताना ज्यांनी बॅनर लावलेत त्यांची खाली नावे दिली असती तर नाचे कशाला म्हणतात हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा नितेश राणे यांनी शिवसेनेला दिलाय.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

दरम्यान, या प्रकाराबद्दल शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलाय. याबाबत मला काही माहिती नाही. जे कुणी काही बोलत आहेत. त्यांना उत्तर देण्याची गरज नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.

इतर बातम्या :

Video : कोल्हापुरातील गव्याने घेतला तरुणाचा बळी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप

अजितदादांची अजब अट! राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो, लातूरमधील औसा इथले शब्द!