शिवसेनेला दुसऱ्याच्या ताटातील खरकटं काढण्याची सवय : आशिष शेलार

शिवसेनेला दुसऱ्याच्या ताटातील खरकटं काढण्याची सवय आहे. कोकणातही तशी म्हणच आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवेसेनेला लक्ष्य केलं.

शिवसेनेला दुसऱ्याच्या ताटातील खरकटं काढण्याची सवय : आशिष शेलार
ashish shelar

मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. शिवसेनेला दुसऱ्याच्या ताटातील खरकटं काढण्याची सवय आहे. कोकणातही तशी म्हणच आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवेसेनेला लक्ष्य केलं. ते मुंबईत आयोजित भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. भाजपने आज (9 फेब्रुवारी) मुंबईत राज्यभरातील निवडक 40 नेत्यांची बैठक घेतली. तसेच आगामी काळाती पक्षाची रणनीती निश्चित केलीय (Ashish Shelar criticize Shivsena again in Mumbai).

आशिष शेलार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने होता. पण शिवसेनेने सत्तेच्या मोहापायी दोन्ही काँग्रेसची साथ धरली. त्यामुळे जनतेत रोष आहे. या रोषाला आम्ही वाट मोकळी करून देऊ. नवी मुंबई आणि मुंबईत शिवसेनेने आमचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या पायावर उभे राहता येत नसल्यानेच आमच्या पक्षातील पदाधिकारी फोडण्याचं काम शिवसेना करत आहे. दुसऱ्याच्या ताटातील खरकटं काढण्याची सवय शिवसेनेला आहे. कोकणातही तशी म्हणच आहे.”

आघाडी सरकार फोल ठरलं

मुंबई आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण व मृत्यू दर अधिक आहे. यावरून देशात कोरोनाची संख्या राज्यात असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. हे सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरलं आहे. सर्वच बाबतीत हे सरकार अपयशी ठरले आहे. शिवसेना फेल ठरतेय हे जनतेने पाहिलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामे आणि त्यांनी आणलेल्या योजना याच्यापुढे राज्यातील आघाडी सरकारला जाता आले नाही. नव्या योजना आणण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

तरुणांकडे लक्ष

राज्यासह देशभरातील तरुणांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आकर्षण आहे. भाजपकडे तरुणांचा कल आहे. त्यामुळे या तरुणांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी 18 ते 25 वयोगटातील तरुणांची युवा वॉरियर्स निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुणांची राजकारणातील नवी फळी तयार करण्यात येणार आहे, असं शेलार म्हणाले. तसेच ओबीसींच्या आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात ओबीसी हक्क परिषद घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

युवा वॉरियर्स, ओबीसी हक्क परिषद; भाजपची महापालिकेसाठी मोर्चाबांधणी सुरू

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीत द्या, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘भाजप नेत्यांनी संस्कार दाखवून दिले’, रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

व्हिडीओ पाहा :

Ashish Shelar criticize Shivsena again in Mumbai

Published On - 5:02 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI