‘भाजप नेत्यांनी संस्कार दाखवून दिले’, रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केलीय. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'भाजप नेत्यांनी संस्कार दाखवून दिले', रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्यावर काही सेलिब्रिटींनी ट्वीट केलं होतं. सेलिब्रिटींनी केलेल्या या ट्वीटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलं आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केलीय. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.(Rohit Pawar’s reply to BJP leaders criticizing Anil Deshmukh)

भाजपचे आमदार अतुल भातखळर यांनी अनिल देशमुखांवर जहरी टीका केलीय. “अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे.देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते.”, असं वक्तव्य अतुल भातखळकरांनी केलं आहे.

भातखळकरांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर

भातखळकर यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “विद्वान व्यक्ती नम्र असते,अन पोकळ व्यक्ती उथळ पाण्यासारखं ‘खळखळ कर’ते! भाजपच्या नेत्यांसह अनेकांना कोरोना झाला, तेंव्हा त्यांना बरं होण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या. भाजपचे उथळ नेते शुभेच्छा देतच नाहीत पण कोरोनामुळं मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत”, असं प्रत्युतर रोहित पवार यांनी दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विट करण्या निर्णय हा संतापजनक ? असून कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, असा संताप देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुखांचा निर्णय काय?

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत”, देवेंद्र फडणवीसांसंह भाजप आक्रमक

सेलिब्रिटीजच्या ‘त्या’ ट्विटची चौकशी होणार; अनिल देशमुखांचे आदेश

Rohit Pawar’s reply to BJP leaders criticizing Anil Deshmukh

Published On - 9:39 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI