मंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, काँग्रेस नेते सोनिया गांधींचीही भेट घेणार

| Updated on: Aug 06, 2020 | 8:45 PM

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली (Ashok Chavan meet Bhagat Singh Koshyari).

मंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, काँग्रेस नेते सोनिया गांधींचीही भेट घेणार
Follow us on

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली (Ashok Chavan meet Bhagat Singh Koshyari). या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील या भेटीची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीत कुरबूर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच काँग्रेसच्या नेत्यांच्या नाराजीचा मुद्दाही सातत्याने पुढे येत आहे. अशा परिस्थितीत अशोक चव्हाण यांनी राज्यपालांची घेतलेली भेट चर्चेला विषय ठरत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटींमागे काय कारण याविषयी अनेक तर्क लावले जात आहेत.


TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाबाबत अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. ते आपली नाराजी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त करणार आहेत. त्यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमवार किंवा मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या 23 जुलैच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, यावर अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता.

याबाबत अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्या नाराजीची बातमी कुणीतरी पेरली असल्याचा सांगत या चर्चेला फेटाळलं होतं.

संबंधित बातम्या :

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नाराजीची चर्चा, दिल्लीला जाऊन सोनिया गांधींकडे खदखद व्यक्त करणार

अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी, बाळासाहेब थोरातांचा दावा

आधी थोरात, मग अशोक चव्हाण, आता नितीन राऊतांकडून नाराजी व्यक्त

तीन पक्षांचे चार दिग्गज, दीड तास चर्चा, ‘वर्षा’वर खलबतं, अखेर अशोक चव्हाणांची नाराजी दूर

संबंधित व्हिडीओ :

Ashok Chavan meet Bhagat Singh Koshyari