तीन पक्षांचे चार दिग्गज, दीड तास चर्चा, ‘वर्षा’वर खलबतं, अखेर अशोक चव्हाणांची नाराजी दूर

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज होते (Minister Ashok Chavan disappointment).

तीन पक्षांचे चार दिग्गज, दीड तास चर्चा, 'वर्षा'वर खलबतं, अखेर अशोक चव्हाणांची नाराजी दूर


मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची नाराजी दूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Minister Ashok Chavan disappointment). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज (24 जुलै) संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या चारही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या चर्चेतून अखेर अशोक चव्हाण यांचे मतभेद दूर करण्यात महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांना यश आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज होते. याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात मुख्यमंत्र्यांकडे नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून ‘वर्षा’ बंगल्यावर अशोक चव्हाण यांचे मतभेद दूर करण्यात आले (Minister Ashok Chavan disappointment).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे.

अधिकाऱ्यांनी त्या त्या खात्यातील मंत्र्यांना गृहित धरुन, परस्पर प्रस्ताव तयार करणे चुकीचे आहे. असे प्रस्ताव सर्वात आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र तसं न झाल्याने अशोक चव्हाण नाराज होणं साहजिक आहे.

यापूर्वीही अशोक चव्हाणांची नाराजी

अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही आपली नाराजी व्यक्त केली होती. “ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही”, अशी नाराजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती. (Ashok Chavan nervous on Thackeray government). “तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार”, असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

संबंधित बातम्या :

अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी, बाळासाहेब थोरातांचा दावा

खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव थेट मंत्रिमंडळ बैठकीत, अशोक चव्हाणांना पत्ताच नाही, मुख्यमंत्र्यांकडे तीव्र नाराजी  

‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI