अशोक चव्हाण यांचा राजीनामा, कॉंग्रेस नेत्याचा प्रदेशाध्यक्षांना इशारा; म्हणाले, काही दिवसात याचे परिणाम…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पार चा नारा दिला आहे. मात्र, हे 400 खासदार ते कशाच्या बळावर निवडून आणणार आहेत हे या घटनेवरून कळते. Party With Different म्हणणारा भाजप पक्ष दुसऱ्या पक्षात तयार झालेले नेते आपल्या पक्षात घेत आहेत.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा, कॉंग्रेस नेत्याचा प्रदेशाध्यक्षांना इशारा; म्हणाले, काही दिवसात याचे परिणाम...
ASHOK CHAVHANImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 5:20 PM

नागपूर | 11 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. यावर कॉंग्रस नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच कॉंग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी थेट नाना पटोले यांनाच इशारा दिलाय. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर दिल्ली हायकमांडने कांग्रेस नेत्यांशी संपर्क साधला. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना हायकमांडने फोन करून राज्यात सकाळपासून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. आज किंवा उद्या दिल्लीतून हायकमांडचे प्रतिनिधी मुंबईत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कॉंग्रसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी ही धक्कादायक आणि आश्चर्यकारक बातमी आहे असे म्हटले आहे. काँग्रेसने चव्हाण यांना सगळीच पदे दिली. 2008 मध्ये 42 व्या वर्षी मुख्यमंत्री पद दिले. असे एकही पद नाही जे त्यांना दिले नाही. तरीही लोक पक्ष सोडून का जातात हा प्रश्न अनाकलनीय आहे. विचारधारेची आणि नीतीमत्तेची लढाई राहिली नाही अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पार चा नारा दिला आहे. मात्र, हे 400 खासदार ते कशाच्या बळावर निवडून आणणार आहेत हे या घटनेवरून कळते. Party With Different म्हणणारा भाजप पक्ष दुसऱ्या पक्षात तयार झालेले नेते आपल्या पक्षात घेत आहेत. रेडिमेड कार्यकर्ते आणि सरकार ते घेत आहे. नवीन कार्यकर्ते, नेते तयार करत नाही. त्यामुळे भाजप 400 खासदार कसे निवडून आणणार याचे हे उदाहरण आहे, असा टोलाही विलास मुत्तेमवार यांनी लगावला.

कॉंग्रेसचे माजी मंत्री नितिन राऊत यांनी राज्यात धक्कादायक घडामोडी घडत आहे असे म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व ज्यांना मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षपद दिले. ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. त्यांनी राजीनामा का दिला त्यामागची करणे माहिती नाही. त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केला. पण, मोबाईल वर संपर्क होऊ शकला नाही. पक्ष म्हणून आम्हाला वेदना झाल्या असे राऊत म्हणाले.

कॉंग्रेस नेत्यांवर दबाव आणून पक्ष प्रवेश केला जात आहे. जो पक्ष घाबरला आहे तो अशा पद्धतीचा दबाव आणून संख्येचे गोळा बेरीज करत आहे. त्यांना राज्यात विजय मिळेल असे वाटत नाही. 1980 मध्ये अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले पण पक्षाला नवीन उभारी घेतली. मी विचार धारेला मानणारा आहे. त्यामुळे माझ्यासोबत कोणताही पक्ष संपर्क करेल असे वाटत नाही असेही नितीन राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारत जोडो यात्रा पुढे जात असल्याने पक्षाचे खच्चीकरण केले जात आहे. सत्ताधारी पक्ष घाबरलेले आहे. त्यामुळेच अशी कृत्ये केली जात आहेत. कोणत्याही पक्षात नाराजी असते. काही नेत्यांना वाळीत टाकलं असेल. पण, त्याचा अर्थ पक्ष सोडून जाणे होत नाही. दिल्ली याबाबतीत बारीक लक्ष देऊन आहे. येणाऱ्या काही दिवसात याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील असा इशारा नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला.

Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.