AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा तर ठाकरे सरकारनं मुंबईकरांवर लादलेला बोजा’, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर भाजपचा हल्लाबोल

राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपनं जोरदार टीका केलीय. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी 'कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारनं हा बोजा लादला आहे', असं म्हटलंय.

'हा तर ठाकरे सरकारनं मुंबईकरांवर लादलेला बोजा', रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर भाजपचा हल्लाबोल
| Updated on: Feb 22, 2021 | 11:38 PM
Share

मुंबई : एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपनं जोरदार टीका केलीय. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारनं हा बोजा लादला आहे’, असं म्हटलंय.(Atul Bhatkhalkar criticizes state government over rickshaw and taxi fare hike)

‘खटूवा समितीचा अहवाल ठाकरे सरकारने स्वीकारल्यामुळे 1 मार्चपासून रिक्षा-टॅक्सीच्या दरात तब्बल 3 रुपयांची वाढ होणार आहे. कोरोनामुळे आर्थिकअडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारने हा बोजा लादला आहे. धंदा कमी होईल या भीतीने अनेक रिक्षा-टॅक्सी संघटनांनी या भाडेवाढीला विरोध केला आहे’, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलंय.

‘परिवहन मंत्री अनिल परब यांनी पेट्रोलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करीत असल्याचं जाहीर केलं. परंतु या भाडेवाढीचा पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढीशी काहीही संबंध नाही. मी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020 मध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी खटूआ समितीच्या शिफारशी राज्य सरकारनं स्वीकारल्या असून, भाडेवाढ होणार हे निश्चित असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कोरोनाच्या अगोदरच भाडेवाढ करण्याचे ठाकरे सरकारनं ठरवले होते. त्याचा आता अंमलबजावणी केली जाणार आहे’, असं भातखळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलंय.

आपले ग्राहक कमी होतील त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भाडेवाढीला आमचा विरोध असेल असं रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी स्पष्टपणे सांगूनही ही अन्यायकारक भाडेवाढ करण्यात आल्याचं भातखळकर यांनी म्हटलंय.

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात किती वाढ?

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठाकरे सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाडेवाढीची घोषणा केली आहे. वाढलेल्या भाड्यानुसार आता ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये होणार आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. अशावेळी रिक्षा आणि टॅक्सी संघटना भाडेवाढीची मागणी करत होते. त्यासाठी या संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. भाडेवाढीच्या निर्णयामुळे या संघटनांना दिलासा मिळाला आहे. पण, आधीच पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Breaking : मुंबईत एमएमआर रिजनमध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, 3 रुपयांनी प्रवास महागणार

Petrol Diesel Price Today : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Atul Bhatkhalkar criticizes state government over rickshaw and taxi fare hike

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.