AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

Petrol Diesel Price Today : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल. डिझेलचे भाव
| Edited By: | Updated on: Feb 22, 2021 | 7:08 AM
Share

मुंबई : गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today 21 February) सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढत आहेत. अशात काल दरांमध्ये थोडीफार स्थिरता पाहायला मिळाल्यानंतर आता पुन्हा दरांमध्ये 30 पैशांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. तर रविवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. तरीही पेट्रोल डिझेलचे दर ऑल टाईम हायवर होते. (petrol diesel price today no changes in rates of fuel on monday)

खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर शनिवारी दिल्लीत 39 पैशांची वाढ झाली. यामुळे पेट्रोलचा दर 90.58 वर पोहोचला होता. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.00 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.58 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 97.00 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.78 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 92.59 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 88.92 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.97 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.06 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.56 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 85.98 रुपये प्रति लिटर

नोएडा (Noida Diesel Price Today): 81.41 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात (Petrol Diesel Price Today 21 February).

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price today no changes in rates of fuel on monday)

संबंधित बातम्या –

…म्हणून पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचलं; पेट्रोलियम मंत्र्यांनीच सांगितलं ‘कारण’

मोठी बातमी! LIC नंतर आता मोदी सरकार विमा क्षेत्रातील ‘या’ दोन कंपन्यांपैकी एक विकणार

Special Report: Gold Rate Today: सोने फेब्रुवारीच्या 20 दिवसांत 3292 रुपयांनी स्वस्त; येत्या आठवड्याभरात स्वस्त होणार की महागणार?

(petrol diesel price today no changes in rates of fuel on monday)

Follow Us
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.