AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहर, तालुका अन् जिल्ह्याचं नाव बदललं… आता सबकुछ छत्रपती संभाजीनगर!! प्रशासन विभागाचं राजपत्र जारी….

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली होती.

औरंगाबाद शहर, तालुका अन् जिल्ह्याचं नाव बदललं... आता सबकुछ छत्रपती संभाजीनगर!! प्रशासन विभागाचं राजपत्र जारी....
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 25, 2023 | 12:19 PM
Share

दत्ता कनवटे,  औरंगाबाद : औरंगाबाद शहराचंच नव्हे तर आता जिल्ह्याचंही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने यासंबंधीचं राजपत्र नुकतंच जारी करण्यात आलंय. काल शहराचं नाव बदलण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली. त्यानंतर विरोधकांनी भाजप तसेच शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. केवळ शहराचं नाव बदलून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली होती. हिंमत असेल तर संपूर्ण जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करून दाखवा, असं आव्हान देण्यात आलं होतं. त्याला देवेंद्र फडवणीस यांनी उत्तरही दिलं होतं.

Aurangabad

काल कोणता निर्णय?

केंद्र सरकारच्या वतीने काल उस्मानाबाद आणि औरंगाबाद शहराचं नाव अनुक्रम धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असं करण्यास मंजूरी देण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात राज्य विधीमंडळाने यास मान्यता दिलेली असताना शिंदे-फडणवीस सरकार श्रेय लाटत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या वतीने जारी केलेल्या पत्रात फक्त शहराचं नाव बदलल्याचा उल्लेख आहे. जिल्ह्याचं नाव कधी बदलणार, यावरून देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आले.

अंबादास दानवे, खैरेंचा सवाल

अंबादास दानवे यांनी काल यासंदर्भातील ट्विट केलं होतं. फक्त शहराचंच नाव बदललंय की संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचंही नाव बदललंय, हे केंद्र सरकारने स्पष्ट करावं. औरंगजेबाचं नाव मिटवायचं असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद… असे यापुढे लिहावे लागेल का, हे पण सांगा, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता…

अर्धवट काहीच ठेवत नाहीत…

अंबादास दानवे यांच्या ट्विटला फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!

Follow Us
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...