AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Temple | निमंत्रण नसल्याचा दावा, राम मंदिराच्या मुख्य पूजाऱ्यांच उद्धव ठाकरेंना उत्तर, ‘निमंत्रण त्यांनाच जे…’

Ram Temple | राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या मुद्यावरुन सध्या राजकारण रंगलं आहे. या सोहळ्याच निमंत्रण कोणा-कोणाला दिलय? कोणाला निमंत्रण नाही? यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता श्री राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पूजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रणाच्या मुद्यावर उत्तर दिलय.

Ram Temple | निमंत्रण नसल्याचा दावा, राम मंदिराच्या मुख्य पूजाऱ्यांच उद्धव ठाकरेंना उत्तर, 'निमंत्रण त्यांनाच जे...'
Acharya Satyendra Das-Uddhav Thackeray
| Updated on: Jan 01, 2024 | 12:01 PM
Share

नवी दिल्ली : अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी सुरु आहे. मंदिर उभारणीच काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 22 जानेवारील अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याच निमंत्रण कोणा-कोणाला दिलय? कोण-कोण येणार? कोणाला निमंत्रण नाही? यावरुन राजकारण रंगल आहे. अलीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच निमंत्रण मिळाल नसल्याच दावा केला होता. त्यावर श्री राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पूजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उत्तर दिलय. “22 जानेवारीला भव्य प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. राम भक्तांना त्याच निमंत्रण देण्यात आलय” असं आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.

“भगवान रामाच्या भक्तांनाच निमंत्रण देण्यात आलय. भाजपा भगवान रामाच्या नावावरुन राजकारण करतय असं म्हणण चुकीच आहे. आपल्या पंतप्रधानांचा सर्वत्र आदर आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रचंड काम केलय. हा राजकारणाचा विषय नाही. ही त्यांची भक्ती आहे” असं मुख्य पूजारी म्हणाले.

‘उद्घाटनाचा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम बनू नये’

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच निमंत्रण नसल्याच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोमणे मारले. “प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच राजकारण करु नये. उद्घाटनाचा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम बनू नये किंवा एकाच पक्षभोवती फिरु नये” असं उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिराच्या उद्घाटनाचा आनंद असल्याच उद्धव ठाकरे म्हणाले. या मुद्यासाठी माझे वडिल बाळासाहेब ठाकरे यांनी लढाई दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.

‘ते प्रभू रामाचा अपमान करतायत’

एएनआयशी बोलताना आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला. “संजय राऊत यांना इतका त्रास होतोय, की ते शब्दातही व्यक्त करुन शकत नाही. एकवेळ ते प्रभू रामाच्या नावावर निवडणूक लढवायचे. ज्यांचा रामावर विश्वास आहे, ते आज सत्तेत आहेत. ते कशाबद्दल बोलतायत? ते प्रभू रामाचा अपमान करतायत” अशा शब्दात आचार्य सत्येंद्र दास यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा