राज ठाकरेंचं तळ्यात-मळ्यात, नांदगावकर म्हणातात, लढायचं ठरल्यास स्वबळावर लढू

राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे (MNS) निवडणूक लढवणार की नाही हेच अजूनही ठरत नाही. कारण मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय झालाच नाही.

राज ठाकरेंचं तळ्यात-मळ्यात, नांदगावकर म्हणातात, लढायचं ठरल्यास स्वबळावर लढू

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे (MNS) निवडणूक लढवणार की नाही हेच अजूनही ठरत नाही. कारण मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय झालाच नाही. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आजच्या बैठकीची माहिती दिली.

बाळा नांदगावकर म्हणाले, “निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्याबाबतचा निर्णय राज ठाकरेच घेतील. ईव्हीएमबद्दल आमची शंका आहेच. निवडणूक लढण्याचा निर्णय झाला तर बहुतांश मतदारसंघात आम्ही स्वबळावर लढू”

गणपती विसर्जनानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. 36 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांचं मत निवडणुका लढवाव्यात असंच आहे. लढायचं झाल्यास स्वबळावर निवडणुका लढणार. निवडणुकीसंदर्भातला निर्णय राज ठाकरे घेतील”, असं नांदगावकरांनी नमूद केलं.

36 विभाग अध्यक्षांशी बोललो आहे. चर्चा केली आहे. राज ठाकरे याबाबत सकारात्मक विचार करतील. अजून ही एकला चलोची भूमिका आहे. आतापर्यंत पक्षाने एकला चलोची भूमिका घेतलेली आहे, असं नांदगावकर म्हणाले.

महाराष्ट्रातील अनेक लोकांशी चर्चा केलेली आहे. ग्रामीण भागातीलही अनेक चांगली कामे आहेत.  अमित ठाकरेदेखील सोबत असतात, आम्हाला आनंद आहे की ते खालून वर जातायत, असं नांदगावकरांनी नमूद केलं.


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI