नाना पटोले यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला, प्रज्ञा सातव विधान परिषदेवर बिनविरोध जाणार?

| Updated on: Nov 18, 2021 | 4:53 PM

आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलीय. प्रज्ञा सातव या बिनविरोध विधान परिषदेवर जाव्यात यासाठी काँग्रेसकडून रणनिती आखण्यास सुरुवात झालीय.

नाना पटोले यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला, प्रज्ञा सातव विधान परिषदेवर बिनविरोध जाणार?
बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलीय. प्रज्ञा सातव या बिनविरोध विधान परिषदेवर जाव्यात यासाठी काँग्रेसकडून रणनिती आखण्यास सुरुवात झालीय. त्यासाठीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. (Balasaheb Thorat meets Devendra Fadnavis to elect Pragya Satav to the Legislative Council)

फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशी एखादी दु:खद घटना घडली तर त्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध दिला जातो. याबाबत फडणवीस आणि पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करु. दरम्यान, नाना पटोले आणि थोरात यांनी फडणवीसांची वेगळी भेट घेतली. त्याबाबत विचारलं असता, नाना पटोले यांचं विमान होतं. तसंच त्यांच्या घरी शुभकार्य आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी ते फडणवीसांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांना तुम्हीही विनंती करा असं सांगितल्याचं थोरात म्हणाले.

रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. काँग्रेसने 15 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली  होती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधी पक्षाशी चर्चा करून प्रज्ञा सातव यांना  बिनविरोध निवडून आणण्याचा  प्रयत्न करणार असल्याच नाना पटोले म्हणाले होते. त्या नंतर आता नाना पटेले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध

यापूर्वी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीवेळी काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसतर्फे रजनी पटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. याच जागेसाठी निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली होती. त्यानंतर भाजप उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
इतर बातम्या :
‘शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, घोटाळेबाजांवर कारवाई होणारच’, किरीट सोमय्यांचा इशारा
‘पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं’, राऊतांच्या वक्तव्याला बोंडेंचं प्रत्युत्तर
Balasaheb Thorat meets Devendra Fadnavis to elect Pragya Satav to the Legislative Council