मोठी बातमी! सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्या आता उद्या सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते, वर्षा निवासस्थानी बैठक झाली, आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आत पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीमध्ये गट नेत्याची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायचे? गट नेता कशा पद्धतीने निवडायचा या सर्व गोष्टींवर चर्चा सुरू आहे.
उद्या महत्त्वाची बैठक
दरम्यान उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यापूर्वी सकाळी आकरा वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून विधीमंडळास पत्र पाठवण्यात आलं आहे. उद्या आमदारांच्या बैठकीस जागा द्यावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे, उद्या विधानभवनात ही बैठक होणार आहे. अद्याप पक्षाकडून निरोप नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे सावधगिरी बाळगत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, अनेक आमदार हे आज रात्रीच तर काही आमदार उद्या सकाळपर्यंत मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे.
