तुम्हालाही उघडायचे आहे पतंजलीचे स्टोअर, स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहा
जर तुम्हालाही पतंजली सोबत व्यवसाय करायचा आहे. स्वत:चे पतंजली स्टोअर उघडायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. चला तर पाहूयात की पतंजलीचे स्टोअर कसे उघडता येईल, त्यासाठी काय प्रक्रीया असणार आहे हे पाहा...

पतंजली फूड्सने जेव्हापासून एफएमसीजी सेक्टरमध्ये पाऊल ठेवले आहे. तेव्हापासून त्याची उत्पादने लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. ज्यामुळे कंपनीचे मार्केट देखील वाढले आणि उत्पादने घरोघरी पोहचली आहेत. अशात पतंजलीचे स्टोअर उघडण्याचा प्लान बनवत आहे. ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. कारण आता तरुणांनी पतंजलीचे स्टोअर उघडण्याची प्रोसेस समजून घ्यावी…
पतंजली स्टोअर उघडण्यासाठी मुख्य रुपाने सुमारे 5 लाख रुपयांचा सुरुवातीची गुंतवणूक करावी लागते आणि 200-2000+ चौरस फूटाच्या जागेची गरज लागते. यासाठी अर्जाची विक्री पतंजली वेबसाईटच्या माध्यमातून 300 रुपयांना करण्यात येत आहे. यासाठी पॅनकार्ड, आधार, दुकानाचा फोटो आणि 5 लाख रुपयांची सुरक्षा जमा (Security Deposit) करावी लागणार आहे.
पतंजली स्टोअर खोलण्याची प्रक्रिया
पतंजलीचे स्टोअर कसे मिळेल ? हे जाणण्याआधी पतंजलीचे स्टोर किती प्रकारचे असतात हे पाहूयात. पतंजलीचे स्टोर तीन प्रकारचे असतात. पहिला ग्रामीण आरोग्य केंद्र, दुसरा पतंजली चिकीत्सालय आणि तिसरा मेगा स्टोअर अशी आहेत. यातील सर्व प्रकारच्या स्टोअरना वेगवेगळी जागा हवी असते. उदाहरणार्थ ग्रामीण आरोग्य केंद्रासाठी सुमारे २०० चौरस फूटाची जागा आणि मेगा स्टोअरसाठी न्यूनतम 2000 चौरस फूट जागेची गरज असते.
एवढ्या गुंतवणूकीची गरज
छोटा स्टोअर उघडण्यासाठी सुमारे ५ ते १० लाख रुपयांच्या गुंतवणूकीची गरज असणार आहे. तर मेगा स्टोरसाठी हा पैसा १ कोटी रुपये वा त्याहून अधिक होऊ शकते. याशिवाय ५ लाख रुपयांचा रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावी लागणार आहे. ज्यात २.५ लाख रुपये दिव्या फार्मेसी आणि २.५ लाख रुपये लाख रुपये पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रुपात द्यावे लागणार आहेत. अर्जदाराला ओळख पत्र ( आधारकार्ड, पॅन कार्ड ), रहिवाशाचा पुरावा, दुकान किंवा जागेच्या मालकीची कागदपत्रे वा भाडे कराराची कॉपी आणि दुकानाचा फोटो जमा करावा लागणार आहे.
अर्ज प्रक्रिया
पतंजलीच्या वेबसाईटवरुन फॉर्म डाऊनलोड करा किंवा ऑनलाईन भरावा
फॉर्मसोबत ३०० रुपयांचे अर्ज शुल्क आणि आवश्यक दस्ताऐवज जमा करावे
यानंतर कंपनीच्या वतीने जागेची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर स्टोअरला मंजूरी दिली जाईल.
मंजूरी मिळाल्यानंतर एग्रीमेंट आणि स्टॉक (Products) मागवून स्टोअर सुरु करावे
अर्ज केल्यानंतर कंपनीच्या सेल्स मॅनेजरशी संपर्क करणे सोपे होईल, त्यामुळे पुढील प्रक्रीया वेगाने पूर्ण करता येईल
