T20i World Cup 2026 : संघ यूएसएचा, कर्णधार गुजरातचा, वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर, सौरभ नेत्रावळकर खेळणार की नाही?
USA Squad For T20i World Cup 2026 : यूएसए क्रिकेट टीमची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत यंदाची ही एकूण आणि सलग दुसरी वेळ आहे. यूएसएने गेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसारख्या संघाला पराभूत केलं होतं. या संघात मुळ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांमध्ये चुरस असणार आहे. या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागलं गेलं आहे. आतापर्यंत बहुतांश संघांची घोषणा करण्यात आली आहे. तर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी अवघे काही तास बाकी असताना आता यूएसए अर्थात यूनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाकडून टीम जाहीर करण्यात आली आहे. यूएसएने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 खेळाडूंना संघात संधी दिली आहे. हा संघ नावापुरता यूएसएचा आहे. या यूएसएच्या संघात बहुतांश खेळाडू हे मुळचे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील आहेत जे इथे कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत.
यूसएचा कॅप्टन कोण?
यूएसएने गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतून पदार्पण केलं होतं. यूएसएने आपल्या पहिल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 8 फेरीत धडक दिली होती. यूएसएने याच जोरावर यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला. यूएसएने मुळचा गुजरातचा असलेल्या मोनांक पटेल याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच यूएसएच्या निवड समितीने गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 खेळाडूंना यंदा संधी दिली आहे. तसेच 2 खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
यूएसएकडून शेहान जयसूर्या आणि मोहम्मद मोहसिन या दोघांचा पहिल्यांदाच संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच मराठमोळ्या शुभम रांजने याला संधी देण्यात आली आहे. मात्र शुभमने यूएसएचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे आता शुबमला टी 20i पदार्पणाची प्रतिक्षा आहे.
सौरभ नेत्रवाळकरच्या कामगिरीकडे लक्ष
मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रवाळकर याचीही संघात निवड करण्यात आली आहे. सौरभने गेल्या वर्ल्ड कपमध्ये 6 विकेट्स मिळवल्या होत्या. सौरभला भारतात खेळण्याचा तगडा अनुभव आहे. अशात आता सौरभ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिल्याच सामन्यात भारताचं आव्हान
दरम्यान यूएसएसमोर त्यांच्या वर्ल्ड कप मोहिमेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. अशात यूएसए या सामन्यात कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
यूएसएच्या सामन्यांचं वेळापत्रक
पहिला सामना, 7 फेब्रुवारी, विरुद्ध टीम इंडिया, मुंबई
दुसरा सामना, 10 फेब्रुवारी, विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
तिसरा सामना, 13 फेब्रुवारी, विरुद्ध नेदरलँड्स, चेन्नई
चौथा सामना, 15 फेब्रुवारी, विरुद्ध नामिबिया, चेन्नई वर्ल्ड कपसाठी यूएसए टीम : मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रिज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शान जहांगीर, सैतेजा मुक्कामला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नॉथुश केंजिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावळकर, अली खान, मोहम्मद मोहसीन आणि शुभम रांजणे.
