अमरावती : शहर हिंसाचार आणि तोडफोड प्रकरणावरून राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका पाहायला मिळतेय. मलिक यांनी ट्विटरवर अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप टाकली आहे. यात दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, हे दाखवणारी ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी टाकली आहे. मलिकांच्या या आरोपांना बोंडे यांनीही आता प्रत्युत्तर दिलंय. तसंच शरद पवार यांनाही बोंडे यांनी जोरदार टोला लगावलाय. (Anil Bonde criticizes Sharad Pawar, Sanjay Raut and Nawab Malik)