एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत… पण; अनिल परबांनी सांगितली समस्या

आम्ही एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. पण केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत... पण; अनिल परबांनी सांगितली समस्या
अनिल परब, परिवहन मंत्री.

मुंबई: आम्ही एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. पण केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असंही अनिल परब यांनी सांगितलं.

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत. केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. तो चर्चा करून सोडवला जाईल. काँग्रेसने आपले मत मांडले. त्याचा विचार समिती करेल. नाना पटोलेंनीही आपले मत समिती समोर मांडावे, असं परब यांनी सांगितलं.

पडळकरांना धोका आहे असं वाटत नाही

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गोपीचंद पडळकर आमदार आहेत. त्यांना गरज असेल तर द्यावी लागेल संरक्षण. मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील असं सांगतानाच पडळकर नेहमीच सरकारविरोधात बोलतात. ती भाषा संसदीय असेल नसेल. संपात असल्यानं धोका आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

त्यांचा विचार करणार

रोजंदारी कर्मचाऱ्यांना काल नोटीस दिलीय. आज 24 तासची वेळ संपत आहे. कोण कामावर येत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संपकरी कामावर न आल्यास 2016-2017 आणि 2019 च्या भरती प्रक्रियेतील वेटिंगवाल्यांचा विचार करावा लागेल, असं त्यांनी सांगितलं. कायदेशीर प्रक्रिया करूनच कारवाई केली जाईल. लोकांची सहानुभूती गेल्यास मग कर्मचारी अडचणीत येतील. सरकार चर्चेसाठी तयार आहेच. सर्व गोष्टींचा अभ्यास करून समिती अहवाल देईल. त्यातून लगेच मार्ग निघणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वेतन करार करण्यास तयार

सरकार कामगारांच्या वेतनाचा करार करण्यास तयार आहे. संप कधी संपणार याचे उत्तर त्यांच्याकडे आहे. आडमुठेपणा ठेवल्यास सर्वांचेच नुकसान होतंय. नेतृत्व करणाऱ्यांचे कामगार ऐकत नाहीत की ते समजवत नाहीत. हे कळत नाहीये, असा चिमटाही त्यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना काढला. हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

‘पोलिसांना सांगा, हा कुंडलिक खांडेंचा गुटखा आहे, निघून जा’, बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची मुजोरी, गुन्हा दाखल

Special Story! सोयाबीन दरवाढीच्या पडद्यामागची गोष्ट, शेतकऱ्यांनी दाखवले एकीचे ‘बळ’

‘कोट यांची भूमिका हिंदुत्व, मंदिरासाठी महत्त्वाची,’ भाजप आमदाराकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे समर्थन, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं ?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI