AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thorat : सागर बंगला आता वॉशिंग मशिनचे काम करतो; थोरातांचा फडणवीसांना टोला

काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे, भाजप (BJP) सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Balasaheb Thorat : सागर बंगला आता वॉशिंग मशिनचे काम करतो; थोरातांचा फडणवीसांना टोला
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 18, 2022 | 12:41 PM
Share

मुंबई : आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आदोंलन करण्यात आले. त्यापूर्वी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे, भाजप (BJP) सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेला सागर बंगला हा वॉशिंग मशिनचे काम करत  आहे असा उपरोधिक टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली याबाबत थोरात यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात सध्या जे काही सुरू आहे, ते घटनाविरोधी आहे. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मात्र राज्यात जे सुरू आहे, त्याकडे राज्यातीलच नाही तर देशातील जनतेचे लक्ष असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांवर हल्लाबोल 

जुन्या मंत्र्यांचे पीए पुन्हा नियुक्त करताना सर्व बाबी तपासून घ्याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत थोरात यांना विचारले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सागर बंगला हा वॉशिंग मशिनचे काम करत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात सध्या सुरू असलेल्या घडोमोडीवरून देखील त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या काय सुरू आहे. सरकार कशापद्धतीने सत्तेत आले, याकडे राज्याच्या नाही तर देशातील जनतेचं लक्ष असल्याचे थोरात यांनी म्हटलं आहे.  आता थोरात यांच्या टीकेला फडणवीस काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जयंत पाटलांचीही टीका

दरम्यान दुसरीकडे जयंत पाटील यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या सरकारकडून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. मात्र  कितीही आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नसल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या ईडी  कारवायांवरून देखील त्यांनी भाजपावर निशाणा साधाला आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..